चीनी मालाला भारतीयांनी धुडकावले, वर्षभरात 45 टक्के ग्राहकांनी खरेदी केले नाही एकही Chinese Product

Chinese Product in India: मागील 12 महिन्यांत मेड इन चायना उत्पादनांची खरेदी कमी करण्यामागील कारणे देखील यावेळी ग्राहकांना विचारण्यात आली.
Chinese Products
Chinese ProductsDainik Gomantak

Indians shun Chinese goods, 45 percent of consumers did not buy a single Chinese product during the year:

गेल्या काही वर्षांत भारत आणि चीन यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा चीनला फटका बसताना दिसत आहे.

कारण नुकतेच करण्यात आलेल्या LocalCircles च्या सर्वेक्षणानुसार, उत्तर देणाऱ्यांपैकी 55 टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितले की त्यांनी मागील वर्षी मेड इन चायना वस्तू खरेदी केल्या होत्या, तर 45 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की त्यांनी कोणतीही चिनी वस्तू खरेदी केली नाही.

चिनी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने "मेड इन इंडिया" आणि "प्रॉडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह" (पीएलआय) योजनांसारख्या सरकारी मोहिमा हाती घेतल्या आहेत.

केंद्र सरकारने गेल्या काही काळात 250 हून अधिक अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत जे "भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण आणि सुरक्षेला प्रतिकूल आहेत" तसेच बेकायदेशीर गुंतवणूक-संबंधित आर्थिक गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवरही बंदी घातली आहे.

भारत सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली यामागे स्पायवेअर्समुळे डेटा चोरी हे एक प्रमुख कारण होते.

सर्वेक्षणात यूजर्सना त्यांच्या फोनमध्ये ईकॉमर्स, डिव्हाइस व्यवस्थापन, गेमिंग, फोटो एडिटर ऑडिओ/व्हिडिओ एडिटर, स्कॅनर किंवा सोशल नेटवर्किंग यांसारख्या उपयुक्ततेशी संबंधित असलेल्या चिनी अ‍ॅप्सची संख्या विचारली.

12,233 उत्तरदात्यांपैकी, 64% लोकांनी "त्यापैकी कोणतेही अ‍ॅप नाही" असे सांगितले. 4% ने सूचित केले की, सध्या त्यांच्या फोनवर अशी 5 किंवा अधिक अ‍ॅप्स आहेत. 6% यूजर्स म्हणाले त्यांच्या फोनमध्ये अशी 3-4 अ‍ॅप्स आहेत. तर 13% लोकांनी अशा 1-21अ‍ॅप्स वापर करत असल्याचे सांगितले तर 13% लोकांनी "सांगता येत नाही" ची निवड केली.

Chinese Products
Groww: नोकरी सोडून सुरू केलेल्या स्टार्टअपचा शेअर मार्केट विश्वात धुमाकूळ, शेतकऱ्याच्या पोराची 7 वर्षात 250 कोटी कमाई

या सर्वेक्षणात विचारले गेले की, ग्राहकांनी गेल्या 12 महिन्यांत खरेदी केलेल्या मेड इन चायना उत्पादनांच्या विविध श्रेणी काय आहेत? 7,022 उत्तरदात्यांपैकी 56% लोकांनी स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, पॉवर बँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाइल अॅक्सेसरीज खरेदी केल्या.

तर 49% ग्राहकांनी सांगितले की त्यांनी, सणाच्या प्रकाशयोजना, दिवे, मेणबत्त्या आणि वॉटर गन सारख्या वस्तूंची खरेदी केली.

दरम्यान 33% ग्राहकांनी ने खेळणी आणि स्टेशनरी, 29% ग्राहकांनी भेट वस्तू, आणि 26% ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांची खरेदी केली.

Chinese Products
Groww: नोकरी सोडून सुरू केलेल्या स्टार्टअपचा शेअर मार्केट विश्वात धुमाकूळ, शेतकऱ्याच्या पोराची 7 वर्षात 250 कोटी कमाई

चीनी मालाला भारतीयांनी का नाकारले?

मागील 12 महिन्यांत मेड इन चायना उत्पादनांची खरेदी कमी करण्यामागील कारणे देखील यावेळी ग्राहकांना विचारण्यात आली.

१२,३५० उत्तरदात्यांपैकी ६३% लोकांनी "भारत-चीन भू-राजकीय वादामुळे भारतात बनवलेली उत्पादने अधिक खरेदी केली" असे म्हटले.

16% ग्राहकांनी सूचित केले की त्यांनी "भारतीय पर्याय हे उत्तम किंमत-गुणवत्ता मिश्रण आहे." 16% ग्रहकांनी सांगितले की, "मेड इन इंडिया उत्पादनांसह चांगली ग्राहक सेवा उपलब्ध होती" या वस्तुस्थितीवरून त्यांची निवड निश्चित करण्यात आली आहे.

13% लोकांनी सांगितले की "पर्यायी गैर-चिनी पण परदेशी (भारतीय नसलेले) उत्पादन उपलब्ध आहे, ज्यात चांगली किंमत, गुणवत्ता आणि ग्राहक सेवा संयोजन आहे."

7% लोकांनी सांगितले की त्यांना "बाजारात चीनमध्ये बनवलेली उत्पादने सापडली नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com