प्रशांत किशोरांच्या प्रस्तावावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

प्रशांत किशोर पक्षात जाणार की नाही यावर सस्पेन्स कायम
sonia gandhi decided to empowered action group 2024 for loksabha election prashant kishor congress entry
sonia gandhi decided to empowered action group 2024 for loksabha election prashant kishor congress entryDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 2024 ची तयारी करताना दिसत आहेत. प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन एक सक्षम कृती गट 2024 तयार केला आहे. हा गट 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी काम करेल.

प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर प्रश्न विचारला असता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी एक सक्षम कृती गट 2024 स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा ते तयार होईल, तेव्हा आम्ही त्याच्या प्रत्येक सदस्याबद्दल आणि त्यांच्या भूमिकांबद्दल माहिती देऊ.

यासोबतच सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसने 13-14 मे रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये 'नवसंकल्प चिंतन शिबीर' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरात 400 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सुरजेवाला म्हणाले- "देशभरातील सुमारे 400 काँग्रेस नेते यात सहभागी होतील... ज्यात पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल".

sonia gandhi decided to empowered action group 2024 for loksabha election prashant kishor congress entry
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर

10 जनपथ येथे झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियंका गांधी उपस्थित होते. मात्र, या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय निर्णय झाला, त्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर पक्षात जाणार की नाही यावर सस्पेन्स कायम आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अलीकडे दोन-तीन वेळा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी काँग्रेसला विजयाचा सविस्तर प्रस्तावही दिला. यानंतर सोनिया गांधी यांनीही याप्रकरणी अनेक वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली आहे, मात्र अद्यापपर्यंत प्रशांतच्या प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. याआधीही प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा होती, राहुल गांधींसोबत भेटही झाली होती, पण नंतर परिस्थिती आणखी बिघडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com