गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना सोमवारी आसाममधील कोक्राझार न्यायालयातून जामीन मिळाला. मेवानी यांना गेल्या आठवड्यात अचानक अटक करण्यात आली होती, मात्र आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुन्हा अटक केल्यानंतर मेवाणी यांना कोक्राझार जिल्ह्यातून तीन किलोमीटरवर असलेल्या बारपेटा येथे नेण्यात येत आहे.
दरम्यान, दुसरे प्रकरण कोणत्या संदर्भात आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. कोक्राझार येथील न्यायालयाने (Court) रविवारी गुजरातचे (Gujarat) अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी (Gujarat MLA Jignesh Mewani) यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. पंतप्रधानांविरोधात ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी (Police) मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून अटक केली होती. यानंतर तो तीन दिवस पोलिस कोठडीत होता.
दुसरीकडे, मेवाणी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने (Congress) धरणे आंदोलन केले होते. रविवारी आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोरा, आमदार दिगंता बर्मन आणि एसके रशीद यांनी पक्ष कार्यालयापासून कोक्राझार पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.