''जीव देईन, पण भाजपला बंगालचे विभाजन होऊ देणार नाही''

तुम्ही मला धमकावू शकता तरीही मी बंगालसाठी लढत राहीन - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
Mamta Banarji
Mamta BanarjiDainik Gomantak

विरोधी पक्षांना सहज धुडकावून लावत धाडसी निर्णय घेणाऱ्या. तसेच आपल्या हवा असलेला निर्णयाबद्दल केंद्र सरकार काय याला फारसा महत्त्व न देता निर्णय घेण्याचे वेगळेपण जपणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत मी माझा जीव देईन, पण भाजपला बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. ( BJP will not allow division of Bengal - Chief Minister Mamata Banerjee )

Mamta Banarji
RSS कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी; संशयिताला बेड्या

भाजपच्या काही नेत्यांनी पश्चिम बंगालपासून वेगळ्या राज्याची मागणी केली होती. यावरुन ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला आक्रमक होत उत्तर दिलं आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझा जीव देईन पण भाजपला बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, तसेच तुम्ही मला धमकावू शकता, माझ्या छातीवर बंदूक ठेवू शकता आणि तरीही मी अखंड बंगालसाठी लढत राहीन. असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Mamta Banarji
शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या पूजा पांडेवर गुन्हा दाखल

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात “अलिप्ततावाद” वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की उत्तर बंगालमधील सर्व समुदायांचे लोक अनेक दशकांपासून एकत्र राहत आहेत, परंतु भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप हा नागरिकांची धर्माच्या आधारावर फुट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हे योग्य नाही. बंगालमध्ये सर्व समुदायांचे लोक सामुहिकरित्या सर्व धर्म सम भाव या प्रमाणे एकत्र राहात असल्याचं ही म्हटलं आहे.

पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, "भाजप कधी गोरखालँडची मागणी करत आहे, तर कधी वेगळ्या उत्तर बंगालची. गरज पडल्यास मी माझे रक्त सांडायला तयार आहे, पण राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही. तसेच अलीपुरद्वारमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोक मला धमकावत आहेत, मी त्यांना घाबरत नाही." कामतापूरला वेगळे राज्य करण्याची मागणी असल्याचे म्हणत सीएम ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com