राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यालये बॉम्बने उडवणार अशी धमकी देणारे संदेश हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत डॉ. नीळकंठ मणी पुजारींना व्हॉटसअॅपवर आले होते. यामूळे वातावरण काहीसं तणावपुर्ण बनले होते. आणि यामूळे या धमकीच्या संदेश पाठवले असतील कोणी यावर तर्क - वितर्क लावले जात होते. मात्र हे संदेश पाठवणाऱ्या संशयित व्यक्तीस तामिळनाडूतील पुडुकुडी येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ( RSS offices to be bombed; One was arrested )
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे त्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. तामिळनाडूतील पुडुकुडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित आरोपी मोहम्मदने एका विदेशी नंबरवरून लखनऊ आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक चे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.
अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारींना व्हॉटसअॅपवर हा मेसेज मोहम्मदने पाठवला होता. या धमकीनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या उत्तरप्रदेश आणि कर्नाटकसह एकूण 6 ठिकाणची आरएसएस कार्यालय उडवून देण्याची धमकी मोहम्मद ने दिली होती. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत हे धमकीचे मेसेज मिळाले आहेत. धमकीचे मेसेज पाठवणारा मोहम्मदला तमिळनाडू पोलिसांनी अटक केली असून, उत्तर प्रदेश पोलीस आता त्याला आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.