शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या पूजा पांडेवर गुन्हा दाखल

अलिगडमध्ये (Aligarh) शुक्रवारच्या नमाज पठणावर बंदी घातल्याप्रकरणी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा शकुन पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dr. Pooja Shakun Pandey
Dr. Pooja Shakun PandeyDainik Gomantak
Published on
Updated on

अलिगडमध्ये शुक्रवारच्या नमाज पठणावर बंदी घातल्याप्रकरणी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा शकुन पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध अतिरिक्त नगर दंडाधिकाऱ्यांनी नोटीसही बजावली आहे. या नोटीसीला उत्तर देताना आपण खरे बोलून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व, असे त्यांनी म्हटले आहे. पूजेसंबंधी जातीयवादी वक्तव्ये करणे आणि वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिगड प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पांडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केले आहे. (A case has been registered against Pooja Shakun Pandey of Hindu Mahasabha for demanding ban on Namaz)

दरम्यान, पूजा पांडे (Dr. Pooja Shakun Pandey) यांनी निवेदनाद्वारे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले होते, त्यानंतर गांधी पार्क पोलिस (Police) ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ''निवेदन सादर करण्यापूर्वी तुम्ही माध्यमांसमोर केलेली वक्तव्यामुळे धार्मिक उन्मादास उत्तेजन मिळाले. ही व्हिडिओ क्लिप तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केली होती, ज्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.''

Dr. Pooja Shakun Pandey
नुपूर शर्मांना दिल्ली पोलिसांनी दिली सुरक्षा, जीवे मारण्याची मिळाली धमकी

शिवाय, जिल्ह्यात कलम 144 लागू असून, त्यात नियमाविरुद्ध गर्दी जमवणे, परवानगीशिवाय कार्यक्रम करणे आणि धार्मिक समुदायाच्या भावना भडकावणारी वक्तव्ये करणे याला मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही आपण केवळ मीडियामध्ये आक्षेपार्ह विधाने केली नाही तर त्यासंबंधीची व्हिडीओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com