Afghanistan:अफगाण पुरुषांसोबत स्त्रियांना बागेत 'नो एन्ट्री', तालिबानचे नवे फर्मान

Taliban
Taliban Dainik Gomantak

अफगाणिस्तानातील तालिबान (Taliban In Afghanistan) राजवटीने आता बागेत स्त्री-पुरुषांच्या प्रवेशाबाबत नवीन नियम लागू केले आहेत. सुमारे 500 वर्षे जुन्या बाग-ए-बाबरच्या तिकीट काउंटरवर अनेकदा गोंधळाचे वातावरण असते. तिकिट खरेदीसाठी आलेल्या एका इसमाला नुकतेच असे समजले की, स्त्री-पुरुषांना स्वतंत्र गेटमधून बागेत प्रवेश करावा लागतो. ही व्यक्ती तिकीट विक्रेत्याला काही प्रश्न विचारते हे नियम मूर्खपणाचे आहेत असे अशी टिका करतो.

Taliban
Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम

दरम्यान, त्या इसमाच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या गेटमधून उद्यानात प्रवेश करायला लावला जातो. स्त्रिया उजवीकडे आणि पुरुष डावीकडून बागेत प्रवेश करतात. यापुढे एकाच कुटुंबातील सदस्य असले तरी त्यांना उद्यानात एकत्र जाण्याची परवानगी राहणार नाही.

देशात अजूनही अनेक लोक आहेत ज्यांना या नियमांची माहिती नाही. अशा परिस्थितीत कुटुंबासह लोक उद्यानाला भेट देण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्या पदरी निराशा पडते. अशात अनेक लोक आपला प्लॅन रद्द करत आहेत. शुक्रवारीही बाग-ए-बाबरच्या बाहेर असेच दृश्य पाहायला मिळाले. घरातील महिला व मुलांना घेऊन बागेत जाण्यासाठी आलेले एक कुटुंब माघारी परतले.

अनेकांनी या निर्बंधांवर आपला राग व्यक्त केला. उद्यानात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, उद्यानात येणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. साधारणत: शुक्रवारी शहरातील विविध उद्यानांमध्ये मोठी गर्दी असायची, मात्र आता असे दृश्य पाहायला मिळत नाहीय. त्यामुळे बागेच्या महसुलात देखील घट झाली आहे.

Taliban
Tata Motors: टाटा टियागो XT Rhythm बाजारात; किंमत, फिचर्स जाणून घ्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com