Bihar: नीतीश कुमारांचा उत्तराधिकारी ठरला ! जाणून घ्या

Bihar: मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि मुख्यमंत्री पदाचादेखील उमेदवार नाही, माझं फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे भाजपला हरवणे
Nitish Kumar
Nitish KumarDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या राजकीय उत्तरअधिकाऱ्याचे नाव जाहीर केले आहे.आत्ताचे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राजकीय वारसदार असतील असे त्यांनी म्हटले आहे. 2025 च्या विधानसभेची निवडणूक तेजस्वी प्रकाश लढवतील असे सूचक विधान नीतीशकुमार यांनी केले आहे.

नीतीश कुमार म्हणतात, " मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि मुख्यमंत्री पदाचादेखील उमेदवार नाही, माझं फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे भाजपला हरवणे ." 2025 मधील बिहार विधानसभेच्या निवडणूकीत तेजस्वी यादव हेच नेते असतील. दरम्यान, नीतीश कुमार याआधी भाजपच्या साहाय्याने केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर, बिहारचे मुख्यमंत्रीसुद्धा बनले आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत युती करत सत्ता स्थापन केली होती.

Nitish Kumar
Cyclone update: पुन्हा चक्रीवादळ येतंय.. गोव्यासह महाराष्ट्रात काय होणार परिणाम?

आता त्यांनी स्पष्टपणे आपले राजकीय ध्येय सांगत भाजपा ( BJP )ला विरोधी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे, बिहार ( Bihar )च्या आगामी निवडणूकीत कोणाचे पारडे जड असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com