हिमाचल प्रदेशमध्ये 'आप'ला मोठा झटका; प्रदेश अध्यक्षच 'भाजप'मध्ये सामील

जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत अनूप केसरी, सतीश ठाकूर आणि इक्बाल सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Dainik Gomantak
Published on
Updated on

हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाबमधील विजयानंतर सर्व राज्यांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला हिमाचलमध्ये मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनूप केसरी, संघटन सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उना अध्यक्ष इक्बाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Big blow to AAP in Himachal Pradesh)

Arvind Kejriwal
झारखंडमध्येही काँग्रेसवर संकट, आमदार मंत्र्यांवर नाराज

जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत अनूप केसरी, सतीश ठाकूर आणि इक्बाल सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, हिमाचलची जनता कधीही आपला अपमान सहन करत नाही, म्हणून 'आप'चे (AAP) तिन्ही नेते स्वतःसाठी आणि हिमाचलच्या स्वाभिमानासाठी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे अरविंद केजरीवाल सामान्य माणसाबद्दल बोलतात, पण आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याकडे लक्ष देत नाहीत.

Arvind Kejriwal
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे Twitter Account हॅक

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले अनूप केसरी?
भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अनूप केसरी म्हणाले, आम्ही आम आदमी पक्षासाठी गेली 8 वर्षे काम करत होतो, मात्र असे असतानाही मंडईतील अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मानजींच्या रॅलीत आमचे कार्यकर्ते 4 तास उन्हात उभे होते. या गोष्टीकडे सर्वजण हिमाचलचा अपमान म्हणून पाहत आहेत आणि सर्व हिमाचलवासी स्वाभिमानी आहेत. आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आम्हाला जी काही जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com