
1. देशात कामगार संघटनांनी बुधवारी (9 जुलै) भारत बंदची हाक दिली
2. भारत बंदमध्ये 25 कोटी कर्मचारी, कामगारांनी काम बंदची घोषणा केलीय
3. वाढती बेरोजगारी, महगाईच्या विरोधात कामगारांचा आक्रोश
Bharat Bandh Wednesday 9 July 2025: देशात पुन्हा एकदा भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 10 केंद्रीय कामगार संघटना, शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांनी एकत्र येत बुधवारी (9 जुलै) रोजी भारत बंदची घोषणा केली. या बंदमध्ये 25 कोटी कर्मचारी आणि कामगार काम करणार नाहीत. म्हणजेच या बंदचा परिणाम देशभर दिसून येणार आहे.
बंद काळात देशातील बँका (Banks) सुरु राहतील का? बँक कर्मचारी शाखेत काम करतील का? याबाबत सामान्य जनतेच्या मनात संभ्रम आहे. कर्मचारी संघटना या बंदद्वारे सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करुन घ्यायच्या आहेत. कर्मचारी आणि कामगार संघटना कामगार कायद्याचे नियम कामगारविरोधी असल्याचे म्हणत आहेत.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयूसी) च्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, या देशव्यापी बंदमध्ये 25 कोटींहून अधिक कामगार सामील होतील. शेतकरी आणि ग्रामीण कामगारही या बंदला पाठिंबा देतील. हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, बंदमुळे बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, कारखाने आणि राज्य वाहतूक सेवा प्रभावित होतील.
9 जुलै 2025 रोजी बँका खुल्या राहतील. जोपर्यंत बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या यादीत सुट्टी जाहीर केली जात नाही तोपर्यंत बँका खुल्या राहतील. बँक शाखा नेहमीच्या दिवसांप्रमाणे काम करतील. आतापर्यंत RBI ने बुधवारी सुट्टी जाहीर केलेली नाही. RBI ज्या तारखांची घोषणा करते त्या तारखांनाच बँका बंद राहतात.
वाढती बेरोजगारी आणि महागाई
आरोग्यसेवा आणि शिक्षण यासारख्या सार्वजनिक सेवांमध्ये कपात
नवीन नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा निवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीवर ठेवणे
गेल्या दशकात राष्ट्रीय कामगार परिषदेचा अभाव
स्थलांतरित कामगारांना अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
सुरक्षा कायद्यांचा वापर करुन निदर्शनांवर कारवाई
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC)
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)
हिंद मजदूर सभा (HMS)
स्वयंरोजगार महिला संघटना (SEWA)
लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (LPF)
युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस (UTUC)
संयुक्त किसान मोर्चासारखे शेतकरी गट
ग्रामीण कामगार संघटना
रेल्वे, एनएमडीसी लिमिटेड आणि स्टील उद्योगातील कर्मचारी
चार कामगार संहिता रद्द करणे
संघटनांचे हक्क आणि संप करण्याचा अधिकार पुन्हा देण्यात यावा
तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण करणे
नवीन भरतीने सरकारी रिक्त पदे भरणे
मनरेगा वेतनात वाढ आणि शहरी भागात विस्तार करणे
सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि नागरी सेवांचे बळकटीकरण
बँकिंग आणि विमा सेवा
पोस्टल ऑपरेशन्स
कोळसा खाणकाम आणि औद्योगिक उत्पादन
सरकारी सार्वजनिक वाहतूक
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स
शाळा आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरु राहतील.
खासगी कार्यालये सुरु राहण्याची अपेक्षा आहे.
1. भारत बंद कधी आहे?
उत्तर- बुधवारी 9 जुलै रोजी भारत बंद आहे.
2. भारत बंदच्या काळात काय सुरु राहणार, काय बंद राहणार?
उत्तर- शाळा आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरु राहतील. खासगी कार्यालये सुरु राहण्याची अपेक्षा आहे. तर बॅंकिंग, विमा, सरकारी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे.
3. भारत बंदची हाक देऊन कामगार काय साध्य करणार?
उत्तर- भारत बंदच्या माध्यमातून कामगार आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवून त्या मंजूर करुन घेणार आहेत.
4. भारत बंदचा रेल्वे, बस, विमान वाहतुकीवर परिणाम होईल का?
उत्तर- भारत बंदचा रेल्वे, बस आणि विमान वाहतूकीवर परिणाम होऊ शकतो.
5. उद्याच्या भारत बंदमध्ये किती संघटना सामील होणार आहेत?
उत्तर- उद्या भारत बंदमध्ये 7 संघटना सामील होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.