Bengaluru Crime: बंगळूरुमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड! बायकोसमोर रिअल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी साधला डाव

Bengaluru Crime News: बंगळूरुमधून खळबळजनक घटना समोर आली. येलहंका न्यू टाउन परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची त्याच्या पत्नीसमोरच अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
Bengaluru Crime News
Bengaluru Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Bengaluru Crime News: बंगळूरुमधून खळबळजनक घटना समोर आली. येलहंका न्यू टाउन परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची त्याच्या पत्नीसमोरच अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हल्लेखोरांनी व्यावसायिकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने बेछूट वार केले आणि अवघ्या एका मिनिटाच्या आत कांड घडवून घटनास्थळावरुन पळ काढला.

39 वर्षीय चरण गौडा असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, प्राथमिक तपासात जमीन व प्रॉपर्टीच्या व्यवहारातून आलेल्या वादातून ही सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी चरण गौडा नेहमीप्रमाणे आपली पत्नी विमर्शनी यांच्यासह कार्यालय पोहोचले होते. त्यांची पत्नी कारमधून उतरुन पहिल्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात निघून गेल्या, तर चरण गाडी पार्क करण्यासाठी खाली थांबले आणि फोनवर बोलत होते.

Bengaluru Crime News
Crime News: टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात वाघिणीला पिंजऱ्यातून बाहेर काढलं अन् 19 वर्षांच्या तरुणाचा थेट गेमच झाला; कंटेंट क्रिएटरची चूक ठरली जीवघेणी

याच दरम्यान आधीपासूनच दबा धरुन बसलेले दोन हल्लेखोर तिथे पोहोचले आणि त्यातील एकाने मोटारसायकलवरुन खाली उतरुन चरण यांच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांना सावध होण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आरोपींनी डोक्यावर ताबडतोड वार करत काही सेकंदातच पसार झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले चरण जागीच कोसळले, ज्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली.

Bengaluru Crime News
Crime News: आधी पत्नीची हत्या, नंतर सासरच्या सहा जणांना संपवले! बंगळुरूमध्ये कॅबचालकाचा धक्कादायक कारनामा; पोलिसांकडून तपास सुरू

मूळचे चन्नापटना तालुक्यातील हरिसंद्रा गावाचे असणारे चरण गौडा येलहंका येथील कोगिलु भागात राहत होते. त्यांचा विवाह तीन वर्षांपूर्वीच विमर्शनी यांच्यासोबत झाला होता आणि ते येलहंका न्यू टाउनमध्ये 'धानी प्रॉपर्टीज' नावाची रिअल इस्टेट फर्म चालवत होते. त्यांचा हा व्यवसाय बंगळूरुसह रामनगर आणि चन्नापटनापर्यंत विस्तारित होता. येलहंका परिसरातील काही व्यक्तींसोबत त्यांचा जमिनीच्या खरेदी-विक्रीवरुन वाद सुरु होता, ज्याच्या आधारे जुनी शत्रूत्त्व किंवा सुपारी किलिंगच्या अँगलने पोलीस कसून तपास करत आहेत. येलहंका न्यू टाउन पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.