टांझानियाची हेअर स्टायलिस्ट निघाली 'ड्रग्ज तस्कर', 29 कोटींच्या ड्रग्जसह 2 विदेशी नागरिक गजाआड; नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

Bengaluru CCB Drug Seizure: कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथे पोलिसांनी केंद्रीय गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 29 कोटींचे ड्रग्ज जप्त केले.
Foreign Nationals Arrested
Foreign Nationals ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Drug Bust: बंगळूरु येथे केंद्रीय गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 29 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांना अटक केली असून ड्रग्जच्या या साखळीतील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 10 किलो 300 ग्रॅम MMDA पिल्स आणि 8 किलो 'हायड्रो गांजा' हस्तगत करण्यात आला. नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने ड्रग्जची ही मोठी खेप बंगळूरुमध्ये आणली गेली होती, अशी माहिती मिळत आहे.

हेअर स्टायलिस्टच्या नावाखाली ड्रग्ज विक्री

पहिल्या आणि सर्वात मोठ्या कारवाईत एका टांझानियाच्या तरुणीला अटक करण्यात आली. नैंसी ओमेरी असे या तरुणीचे नाव असून ती बंगळूरुमध्ये 'हेअर स्टायलिस्ट' म्हणून काम करत होती. ती या व्यवसायाच्या नावाखाली ती ड्रग्ज विक्रीचा अवैध धंदा करत होती. नैंसी 2023 मध्ये 'टुरिस्ट व्हिसा'वर नवी दिल्लीत आली होती. त्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वस्तात ड्रग्ज खरेदी करुन बंगळूरुमध्ये जास्त दराने विकत होती. CCB च्या पथकाने आरोपी महिलेकडून 9 किलोपेक्षा जास्त MMDA पिल्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे साडे 18 कोटी रुपये आहे.

Foreign Nationals Arrested
Bengaluru Robbery: बंगळूरुमध्ये 7.11 कोटींची कॅश व्हॅन लुटली! 'आरबीआय अधिकारी' असल्याची बतावणी करत दिली पिस्तुलाची धमकी

अडीच कोटींच्या ड्रग्जसह तरुणही अटकेत

दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी इमानुअल अरिंजे नावाच्या एका परदेशी तरुणाला अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी अडीच कोटींचे MMDA पिल्स जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेला हा आरोपी यापूर्वीही ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अटक होऊन कारागृहाची शिक्षा भोगून आलेला आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याने पुन्हा ड्रग्जचा धंदा सुरु केला होता.

Foreign Nationals Arrested
Bengaluru Crime: ॲम्ब्युलन्स बनली 'काळ', तीन दुचाकींना चिरडले, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; बंगळुरुतील रिचमंड सर्कलवर थरार

8 किलो 'हायड्रो गांजा' जप्त

तिसऱ्या महत्त्वपूर्ण कारवाईत कस्टम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, CCB च्या पथकाने बंगळूरुमधील चामराजपेट फोरिन पोस्ट ऑफिसमध्ये एका संशयित पार्सलवर धाड टाकली. या पार्सलची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 8 किलो 'हायड्रो गांजा' सापडला. हायड्रो गांजा हा सामान्य गांजापेक्षा अधिक प्रभावी आणि महागडा मानला जातो. पोलिसांनी हे पार्सल पाठवणारे आणि बंगळूरुमध्ये ज्याच्या नावावर हे पार्सल पाठवले गेले होते, त्या दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला.

नवीन वर्षाच्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ड्रग्जची इतकी मोठी खेप जप्त झाल्यामुळे बंगळूरु पोलिसांनी मोठी हानी टळल्याचा दावा केला. या ड्रग्जच्या नेटवर्कशी जोडलेल्या अन्य आरोपींचा शोध आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासण्याचे काम सध्या CCB कडून सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com