बेळगाव: मध्यवर्ती महाराष्ट्र (Maharashtra) एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नडिगांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज मंगळवारी बेळगाव(belgaum) बंदची हाक दिली आहे. बंदला शहर आणि तालुक्यातील विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावांमध्येही बंद पाळला जाणार आहे.
या घटनेनंतर हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी समितीतर्फे टिळकवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून बेळगावात सुरू झाले. याला विरोध व सीमाभाग महाराष्ट्रात समावेश करावा, या मागणीसाठी म. ए. समिती मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करते. आतापर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनावेळी समितीने महामेळावा घेतला आहे. सोमवारी महामेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी अध्यक्ष दळवी यांच्यावर काही कन्नडिगांनी शाई फेकली. याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला तसेच पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याची मागणी केली. समिती नेत्यांनी मेळावा पार पाडल्यानंतर पोलिस ठाण्यावर जाऊया, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. नेतेमंडळींचे मार्गदर्शन झाल्यानंतर मोर्चाने समिती कार्यकर्ते व्हॅक्सिन डेपोवरून पोलिस ठाण्याकडे निघाले होते. हॉटेल फुल्ल!
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून बेळगावात सुरू झाले असून बेळगावात राहाण्यासाठी हॉटेल उपलब्ध नाही. सगळीच महत्त्वाची हॉटेल शासनातर्फे आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी बेळगावला गेलेल्या गोवेकरांसाठी निवासाची मोठी अचडण झाली. ही स्थिती अधिवेशन संपेपर्यंत राहाणार आहे, अशी माहिती हॉटेल चालकांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.