BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

BCCI Central Contracts 2026: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या वार्षिक कराराच्या रचनेत (Central Contract) ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे.
BCCI Central Contracts
BCCI Central ContractsDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या वार्षिक कराराच्या रचनेत (Central Contract) ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलांमुळे भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या मानधनावर मोठी कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या कंत्राटातील सर्वात वरची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी 'A+' ही श्रेणी पूर्णपणे बंद केली जाऊ शकते. यामुळे वरिष्ठ खेळाडूंपासून ते युवा स्टार्सपर्यंत सर्वांच्याच आर्थिक गणितांवर परिणाम होणार आहे.

भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केंद्रीय कराराच्या संरचनेत बदल करण्याची शिफारस केली आहे. सध्या खेळाडूंना A+, A, B आणि C अशा चार श्रेणींमध्ये विभागले जाते. मात्र, नव्या प्रस्तावानुसार A+ श्रेणी काढून टाकून केवळ A, B आणि C या तीनच श्रेणी ठेवण्याचे सुचवण्यात आले आहे. सद्यस्थितीत A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. ही श्रेणी रद्द झाल्यास या श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी किंवा ३ कोटींच्या गटात स्थान मिळेल.

रोहित-विराट आणि बुमराहला बसणार फटका

जर हा नवीन नियम लागू झाला, तर टीम इंडियाचे दोन सर्वात मोठे आधारस्तंभ रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा फटका बसू शकतो. या दोन्ही खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.

केवळ दोन फॉरमॅट खेळत असल्यामुळे त्यांना थेट 'B' ग्रेडमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे. तसेच, जगातला नंबर १ गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनाही त्यांच्या ७ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागू शकते.

BCCI Central Contracts
Goa Beach: गोव्यातल्या बीचवर हे काय चाललंय? एका आठवड्यात 10 कासवे मृत; प्रदूषण की इतर कारण? होणार तपासणी

शुभमन गिलच्या 'प्रमोशन'वर टांगती तलवार

या निर्णयाचा परिणाम केवळ वरिष्ठ खेळाडूंवरच नाही, तर युवा फळीवरही होणार आहे. भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शुभमन गिलला आगामी हंगामात 'प्रमोशन' मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, जर ७ कोटींची A+ श्रेणीच शिल्लक राहिली नाही, तर गिलला 'A' श्रेणीतच समाधान मानावे लागेल. एप्रिल २०२५ मध्ये जाहीर होणाऱ्या नव्या करारात कोणाचे स्थान कुठे असेल, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

BCCI Central Contracts
Goa Accident: गोव्यात रस्त्यांवरून चालणे ठरत आहे धोकादायक? 57 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्‍यू; रस्‍ता सुरक्षेबद्दल जागृतीची मागणी

अपेक्स कौन्सिलच्या बैठकीकडे लक्ष

बीसीसीआय सध्या A+ साठी ७ कोटी, A साठी ५ कोटी, B साठी ३ कोटी आणि C साठी १ कोटी रुपये वार्षिक मानधन देते. निवड समितीने सुचवलेला हा 'थ्री-टियर' मॉडेल (तीन श्रेणींचे मॉडेल) प्रत्यक्षात येणार की नाही, याचा अंतिम निर्णय बीसीसीआयच्या आगामी अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल. या बैठकीत श्रेणी बदलण्यासोबतच मानधनाच्या रकमेतही काही फेरफार होणार का, हे स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com