UP Election: कचऱ्याच्या गाडीत आढळला बॅलेट पेपर; तीन अधिकाऱ्यांवरती कारवाई

उत्तर प्रदेशातील बरेली येथे मतमोजणीच्या एक दिवस आधी SDM बहेरी हटवण्यात आले आहे.
UP Election 2022 |UP Election 2022 News Updates
UP Election 2022 |UP Election 2022 News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली येथे मतमोजणीच्या एक दिवस आधी SDM बहेरी हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यात बरेलीत कचऱ्याच्या वाहनांमध्ये पोस्टल बॅलेट सापडल्याचं म्हटलं गेलं होतं. एसडीएम बहेदी पारुल तरार यांनी कचऱ्याच्या गाडीत पोस्टल बैलेट भरलेल्या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी पाठवल्या होत्या. ही बातमी समजताच सपा कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यासोबतच राज्यातील तीन बड्या अधिकाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले आहे. (Ballot paper found in garbage truck Action against three officers)

UP Election 2022 |UP Election 2022 News Updates
Vaccination: 12-17 वर्ष वयोगटातील मुलांना मिळणार कोवोव्हॅक्स, DCGI ने दिली मंजूरी

मंगळवारी संध्याकाळी पोस्टल बॅलेट (Postal Ballet) पेपरने भरलेले तीन बॉक्स सपा कार्यकर्त्यांनी पान बाहेरी येथे कचऱ्याच्या गाडीत पकडले आहेत. परसाखेडा महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीत मतपत्रिका भरून मतमोजणीच्या ठिकाणी आल्याचा आरोप सपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावरून सपा कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. पोलिस प्रशासनाने बराच समज आणि तपास केल्यानंतर सर्वजण शांत झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गदारोळ झाल्यानंतर सपई तेथेच आपला तळ ठोकून बसले तर, त्यानंतर बुधवारी मोठी कारवाई करत प्रशासनाने बहेरीच्या एसडीएम पारुल तरार यांना हटवले. आता त्यांच्या जागी राजेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. (UP assembly Election 2022 News Updates)

सपाला त्रास होण्याची भीती,

कचरा वेचणाऱ्या वाहनात पोस्टर बॅलेट पेपर आल्यानंतर मतमोजणीत गडबड होण्याची भीती समाजवादी पक्षाच्या नेत्यांना धास्तावत आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीत भाजप गडबड करू शकतो, असे समाजवादी नेत्यांचे म्हणणे आहे. निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेऊन अशा अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करावी.

UP Election 2022 |UP Election 2022 News Updates
मोदी सरकारचा मोठा निर्णय, संरक्षण क्षेत्रात भारत लवकरच 'आत्मनिर्भर'

या अधिकाऱ्यांवरतीही कारवाई केली

वाराणसीतील ईव्हीएमचे नोडल अधिकारी आणि सोनभद्रमधील रिटर्निंग ऑफिसर यांनाही निवडणूक आयोगाने काढून टाकले आहे. उत्तर प्रदेशशिवाय उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये गुरुवारी मतमोजणी पार पडणार आहे. या राज्यांमध्ये सात टप्प्यांत विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले आहे की, एडीएम नलिनी कांत सिंह यांना ईव्हीएम वाहतूक करण्यात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून निवडणूक ड्युटीवरून हटवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com