Vaccination: 12-17 वर्ष वयोगटातील मुलांना मिळणार कोवोव्हॅक्स, DCGI ने दिली मंजूरी

भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) कोवोव्हॅक्सला 12-17 वर्षे वयोगटासाठी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
Vaccination
VaccinationDainik Gomantak

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. परंतु कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सरकार लसीकरणावर अधिक भर देत आहे. यातच आता भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) कोवोव्हॅक्सला 12-17 वर्षे वयोगटासाठी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. 18 वर्षांखालील मुलांसाठी मान्यता मिळवणारी ही चौथी लस आहे. CDSCO च्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीने 12 ते 17 वयोगटातील लोकांसाठी कोवोव्हॅक्सला आपत्कालीन वापरासाठी परवानगी (EUA) ची शिफारस केल्यानंतर भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) ची मंजुरी मिळाली आहे. (Covovax vaccine approved by DCGI for children aged 12-17 years)

SII 2707 मुलांवर अभ्यास करते

15 वर्षांखालील किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, लसीकरण मोहिमेत अधिकाधिक नागरिकांचा समावेश करुन घेण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे. 21 फेब्रुवारी रोजी, SII चे संचालक (Government and regulatory affairs) प्रकाश कुमार सिंग यांनी DCGI कडे केलेल्या अर्जात म्हटले की, 12 ते 17 वर्षे वयोगटातील अंदाजे 2707 मुलांवरील दोन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोवोव्हॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिकारक आणि सुरक्षित आहे.

Vaccination
Corbevax Vaccine लस ठरतेय कोरोनावर रामबाण उपाय!

दरम्यान, सिंग यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे की, ही मंजुरी केवळ आपल्या देशासाठीच फायदेशीर नाही तर संपूर्ण जगाला लाभदायक ठरेल. हे आपल्या पंतप्रधानांचे 'मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड'चे स्वप्न पूर्ण करेल. आमचे सीईओ डॉ. अदार सी पूनावाला यांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने, मला खात्री आहे की, कोवोव्हॅक्स आपल्या देशातील मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

Vaccination
Covid 19 Vaccination: 2 ते 18 वयोगटातील मुलांचेही होणार लसीकरण

आपत्कालीन वापरासाठी Kovovax ला मंजूरी

DCGI ने 28 डिसेंबर रोजी 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी Kovovax ला आधीच मान्यता दिली आहे. देशाच्या लसीकरण मोहिमेत अद्याप त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. DCGI ने 21 फेब्रुवारी रोजी 12 ते 18 वर्षांखालील वयोगटासाठी काही अटींनुसार बायोलॉजिकल E's Covid-19 लस Corbevax चा मर्यादित वापर करण्यास परवानगी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com