Dhirendra Krishna Shastri: धीरेंद्रकृष्ण शास्त्री काँग्रेससाठी 121 किलोमीटरची पदयात्रा काढणार?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मंदिरात हनुमानाची पूजाही केली.
Bageshwar Dham
Bageshwar DhamDainik Gomantak

Bageshwar Dham: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मंदिरात हनुमानाची पूजाही केली. तेव्हापासून सोशल मीडियावर वृत्तपत्राचे कटिंग आणि पोस्टर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की धीरेंद्र कृष्ण शास्त्री काँग्रेससाठी 121 किलोमीटरची पदयात्रा काढतील.

याबाबत कमलनाथ यांनी बागेश्वर बाबांची भेट घेतली होती. हे कटिंग आणि पोस्टर इतके व्हायरल झाले की, बागेश्वर धामला स्पष्टीकरण द्यावे लागले. बागेश्वर धामने या वृत्ताचे खंडन केले आहे.

पोस्टरमध्ये काय होते?

बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री काँग्रेस (Congress) पक्षासाठी 121 किलोमीटरचा प्रवास करतील, असा दावा पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. विदिशाचे आमदार शशांक भार्गव यांच्या नावाने हे पोस्टर रिलीज करुन व्हायरल करण्यात आले आहे. आता बागेश्वर धामने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Bageshwar Dham
Bageshwar Dham: बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? धीरेंद्र शास्त्रींचा मोठा खुलासा

दरम्यान, हे वृत्त पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि चुकीचे असल्याचे बागेश्वर धामच्या वतीने सांगण्यात आले आहे. बागेश्वर धाम कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही आणि होणारही नाही. बागेश्वर धामला बदनाम करण्याचा हा डाव आहे.

Bageshwar Dham
Bageshwar Dham: '...तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवेन' - अंनिसच्या श्याममानव यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

विदिशाचे आमदार शशांक भार्गव यांनी स्पष्टीकरण दिले

पोस्टर आणि बातमी व्हायरल झाल्यानंतर विदिशाचे आमदार शशांक भार्गव यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिले की, बागेश्वर बाबांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. ही दिशाभूल करणारी बातमी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

त्या बातमीसह काही अज्ञात व्यक्तीने माझे पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले आहे. बागेश्वर बाबा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाहीत. रामनामाचा महिमा सर्व जगापर्यंत पोहोचावा अशी त्यांची इच्छा आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे मी खंडन करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com