Bageshwar Dham: बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? धीरेंद्र शास्त्रींचा मोठा खुलासा

Dhirendra Shastri-Jaya Kishori: मध्य प्रदेशातील छरपूर येथे असलेले बागेश्वर धाम सध्या चर्चेत आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्कारांची सर्वत्र चर्चा आहे.
Dhirendra Shastri
Dhirendra ShastriDainik Gomantak
Published on
Updated on

Dhirendra Shastri-Jaya Kishori: मध्य प्रदेशातील छरपूर येथे असलेले बागेश्वर धाम सध्या चर्चेत आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्कारांची सर्वत्र चर्चा आहे. नागपूरमधील वादानंतर गुगलवर त्यांच्याबद्दल लोक सर्च करु लागले आहेत. यानंतर बागेश्वर सरकारकडून एकापाठोपाठ एक अनेक वक्तव्ये केली जात आहेत.

दरम्यान, बागेश्वर सरकार आणि सुप्रसिद्ध कथाकार जया किशोरी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर (Social Media) येत आहेत. आता प्रश्न असा पडतो की, बागेश्वर सरकार खरोखरच लग्नासंबंधी विचार करत आहेत का? जया किशोरी आणि बागेश्वर सरकार यांच्या लग्नाच्या बातमीत किती तथ्य आहे.

Dhirendra Shastri
Bageshwar Dham: '...तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवेन' - अंनिसच्या श्याममानव यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

तसेच, लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर खुद्द बागेश्वर सरकारनेच (Government) दिले आहे. लग्नाच्या चर्चेवर त्यांना अनेकदा विचारण्यात आले आहे. त्यांच्या अनुयायांनाही या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत. सर्व चर्चा आणि अटकळांच्या दरम्यान खुद्द बागेश्वर सरकारने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला.

प्रथम, आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांच्याबद्दल सांगणार आहोत. जया किशोरी या प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. कथाकार जया किशोरी जी यांचे पूर्ण नाव जया शर्मा आहे. 13 जुलै 1995 रोजी राजस्थानच्या सुजानगढ येथे जन्मलेल्या जया किशोरी यांचे वडील पूज्य राधे श्याम जी हरितपाल (शिव शंकर शर्मा) आहेत. त्यांच्या आईचे नाव गीता देवी हरितपाल आणि एक बहीण चेतना शर्मा देखील आहे.

Dhirendra Shastri
Bageshwar Dham: अंधश्रद्धा पसरवण्याविरोधात कायदा काय म्हणतो? धीरेंद्र शास्त्रीला किती होऊ शकते शिक्षा...

शिवाय, ब्राह्मण कुटुंबातील जया किशोरी त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्या लहानपणापासूनच भगवंताच्या भक्तीत मग्न होती. आता बागेश्वर सरकार आणि जया किशोरी यांच्या लग्नाबाबत व्हायरल बातम्यांबद्दल बोलूया. या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे बागेश्वर सरकारने म्हटले आहे. तसेच, त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com