Amanda Wellington: "मला भारताकडून क्रिकेट खेळायचंय..." दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडूचं विधान चर्चेत VIDEO

Amanda Wellington News: ऑस्ट्रेलियाची स्टार महिला क्रिकेटपटू अमांडा वेलिंग्टन सध्या चर्चेत आहे.
Amanda Wellington
Amanda WellingtonDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलियाची स्टार महिला क्रिकेटपटू अमांडा वेलिंग्टन सध्या चर्चेत आहे. अलीकडेच ती अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. या कार्यक्रमात अमांडाने स्टेजवर जाऊन दिलजीतला खास अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सची जर्सी भेट दिली आणि स्वतःला दिलजीतची मोठी चाहती असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चाहते तिच्या भारतीय प्रेमावर फिदा झाले. ऑस्ट्रेलियासाठी दोन विश्वचषक जिंकलेली ही स्पिनर आता भारताशी असलेल्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

अमांडाने अलीकडेच अ‍ॅडलेडमध्ये न्यूज२४शी बोलताना तिच्या भारतीय संस्कृतीवरील प्रेमाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या. "मी पहिल्यांदा २०१६ मध्ये भारतात आले, तेव्हापासून मला भारतातील लोक, त्यांचे अन्न, आणि संस्कृती खूप आवडते," असे ती म्हणाली. तिला मसालेदार भारतीय पदार्थ आवडतात आणि ती स्वतःही भारतीय जेवण शिकण्याचा प्रयत्न करत आहे. "भारतीय अन्न म्हणजे चव आणि भावना, आणि मला दोन्ही आवडतात," असे अमांडा म्हणाली.

Amanda Wellington
Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खास खुलासा केला. अमांडाने सांगितले की तिचे लग्न एका पंजाबी युवक हमराजशी झाले असून त्यांचा विवाह भारतातील ताजमहाल येथे पार पडला. "तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. आम्ही ताजमहालात लग्न केल्यानंतर काही पारंपारिक दागिने घेतले. आता मी हिंदी आणि पंजाबी शिकत आहे, मंदिरात जाते आणि मंगळवार व शनिवारी शाकाहारी जेवण करते. मी भारतीय संस्कृतीचा भाग बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात मला आनंद मिळतोय," असे ती म्हणाली.

२०१८ आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकलेल्या अमांडाने एक दिवस भारतासाठी खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ती म्हणाली, "माझ्या मनात नेहमी वाटतं की मी भारतीय आहे. कदाचित मी माझ्या मागील जन्मात भारतीय होते. लग्नानंतर मला दुहेरी नागरिकत्व मिळाले, तर कोण जाणे कदाचित एक दिवस मी भारतासाठी खेळताना दिसेन." तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला "भारतीय सून" म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अमांडा वेलिंग्टन येत्या महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या मेगा लिलावाबद्दल खूप उत्साहित आहे. हा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि अमांडाचे नाव लिलावाच्या गटात आहे. ती म्हणाली, "मी यंदा माझी निवड होण्याची खूप आशा करते. भारतात परत येऊन WPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर ते माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल."

Amanda Wellington
Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

अमांडाने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी, १४ एकदिवसीय आणि आठ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात अनुक्रमे दोन, १८ आणि १० बळी घेतले आहेत. इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळताना तिने ४० सामन्यांत ५२ विकेट घेतल्या आहेत. अमांडाची अचूक लेग स्पिन आणि तिची आनंदी स्वभावशैली तिला चाहत्यांमध्ये लोकप्रिय बनवते, आणि आता तिचे भारतीय संस्कृतीप्रेमही तिच्या लोकप्रियतेत भर घालत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com