Alyssa Healy Retirement: क्रीडा विश्वात खळबळ! 8 विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Alyssa Healy International Cricket Retirement: ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज खेळाडू एलिसा हीली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.
Alyssa Healy international cricket retirement
Alyssa Healy international cricket retirementDainik Gomantak
Published on
Updated on

Alyssa Healy Retires from International Cricket :जागतिक महिला क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने आणि यष्टीरक्षणाने दबदबा निर्माण करणारी ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज खेळाडू एलिसा हीली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १५ वर्षांपासून ऑस्ट्रेलियन संघाचा अविभाज्य भाग असलेल्या हिलीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त होत आहे. भारताचा आगामी दौरा हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा असणार आहे.

एलिसा हीली ही केवळ एक खेळाडू नसून ऑस्ट्रेलियाच्या विजयी घोडदौडीची मुख्य शिल्पकार मानली जाते. तिच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिने ऑस्ट्रेलियाला तब्बल ९ वेळा विश्वविजेते बनवण्यात मोलाची भूमिका बजावली. यामध्ये ६ टी-२० विश्वचषक आणि ३ एकदिवसीय (ODI) विश्वचषकांचा समावेश आहे. २०१० मध्ये पदार्पण केल्यापासून तिने आपल्या स्फोटक फलंदाजीने अनेक विक्रम प्रस्थापित केले.

Alyssa Healy international cricket retirement
Goa Assembly Session: खरा विकास आनंदात, देशातील पहिला ‘हॅपीनेस इंडेक्स’ गोव्यात; राज्यपालांचे प्रतिपादन

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना हिली भावूक झाली होती. ती म्हणाली, "पुढील भारत दौरा हा ऑस्ट्रेलियासाठी माझा शेवटचा दौरा असेल, हे सांगताना मनात संमिश्र भावना आहेत. ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची ओढ आजही कायम आहे, पण ज्या तीव्र स्पर्धेच्या भावनेने मला सुरुवातीपासून प्रेरित केले, ती आता कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळेच थांबण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते." तिने आपल्या संघसहकाऱ्यांसोबत घालवलेले क्षण आणि ऑस्ट्रेलियन संघाचे विजयगीत गाण्याच्या आठवणींनाही उजाळा दिला.

Alyssa Healy international cricket retirement
Goa Assembly Election 2027: विधानसभेसाठी ‘आप’ची युतीकरिता तयारी! वाल्मिकी नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका Watch Video

आकडेवारी

एलिसा हीलीने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यात ७ शतकांच्या मदतीने ३५६३ धावा आणि टी-२० मध्ये ३०५४ धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून तिने विकेटच्या मागे २७५ बळी टिपले आहेत.

महान यष्टीरक्षक इयान हिली यांची पुतणी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी असूनही, अलिसाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिला 'सर्वकालीन महान खेळाडू' म्हणून गौरवले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यानंतर ती शेवटची मैदानावर दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com