Viral Video: "ऐसी की तैसी कर दूंगी…"; ठाकूर असल्याचा माज दाखवत बँक कर्मचार्‍याची दादागिरी, गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video News: बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने महिला खातेदाराशी अत्यंत अभद्र भाषेत संवाद साधत तिला जीवे मारण्याची आणि 'ऐसी की तैसी' करण्याची धमकी दिली.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

बँकेत सेवा देण्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यानेच जर ग्राहकाला जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिली, तर सामान्य माणसाने काय करावं? उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पनकी येथील एचडीएफसी (HDFC) बँकेत असाच काहीसा प्रकार घडला आहे. बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने महिला खातेदाराशी अत्यंत अभद्र भाषेत संवाद साधत तिला जीवे मारण्याची आणि 'ऐसी की तैसी' करण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत असून बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अपशब्दांचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, पनकी येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत एका कामासाठी आलेल्या महिला खातेदाराचा बँक कर्मचाऱ्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच गंभीर हाणामारीत आणि शिवीगाळीत झाले.

व्हायरल व्हिडिओमध्ये बँक कर्मचारी आस्था सिंह ही ग्राहकावर ओरडताना दिसत आहे. तिने रागाच्या भरात "ठाकूर आहे मी, 'ऐसी की तैसी' करीन की लक्षात ठेवाल," अशा शब्दांत स्वतःच्या जातीचा अहंकार दाखवत ग्राहकाला धमकावले. इतकेच नाही तर तिने अत्यंत खालच्या स्तरावरील अपशब्द वापरून खातेदाराचा अपमान केला.

Viral Video
Goa Politics: येणाऱ्या काळात गोव्याचा 'विली' कोण असेल? ‘प्रादेशिक हायकमांड’ आणि काँग्रेस

सोशल मीडियावर तीव्र संताप

बँकेतील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित महिला कर्मचारी शांत होण्यास तयार नव्हती. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. आता हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरत आहे. नेटिझन्सनी या वर्तनाचा तीव्र निषेध केला असून, "खाजगी बँकेत ग्राहकांना अशी वागणूक मिळत असेल, तर लोकांनी तिथे खाते का उघडावे?" असा सवाल उपस्थित केला आहे.

Viral Video
Goa Accident: हे कधी थांबणार? गोव्यात एकाच दिवशी 3 जणांचा अपघाती मृत्यू; सांकवाळ, वेळसाव, शिरगाव येथे तरुणांनी गमावला जीव

कठोर कारवाईची मागणी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी एचडीएफसी बँकेच्या अधिकृत हँडलला टॅग करून संबंधित कर्मचारी आस्था सिंह हिच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जातीवाचक भाष्य करणे आणि ग्राहकाला धमकी देणे हे नियमांच्या विरोधात असून, बँकेच्या प्रतिमेला यामुळे तडा गेला आहे. बँक व्यवस्थापन या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करणार की केवळ चौकशीवर बोळवण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com