
Auqib Nabi Record: देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळाडू आपला जलवा दाखवत आहेत. या स्पर्धेत अशी एक ऐतिहासिक कामगिरी झाली, जी यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. नॉर्थ झोन कडून खेळणाऱ्या औकीब नबीने सलग चार चेंडूंवर चार विकेट घेत एक मोठा इतिहास रचला. दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात असा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. या सामन्यात औकीबने पाच विकेट्स घेतल्या.
औकीब नबी हा मूळचा जम्मू-काश्मीरचा असून, तो दुलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ झोन संघासाठी खेळतो. ईस्ट झोनविरुद्ध त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला हादरवून सोडले. भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात औकीब नबीच्या आधी तीन खेळाडूंनी चार चेंडूंमध्ये चार विकेट घेण्याचा कारनामा केला, पण ते सर्व विक्रम रणजी ट्रॉफीमध्ये झाले होते. दुलीप ट्रॉफीमध्ये असा पराक्रम करणारा औकीब नबी हा पहिलाच खेळाडू बनला.
याआधीच्या विक्रमांचा विचार केल्यास, सर्वप्रथम 1988 मध्ये दिल्लीच्या शंकर सैनीने दिल्ली संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. त्यानंतर 2018 मध्ये जम्मू-काश्मीरच्याच मोहम्मद मुदस्सीरने राजस्थानविरुद्ध चार चेंडूंवर चार विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर, 2024 मध्ये मध्य प्रदेशच्या कुलवंत खेजरोलियाने बडोदाविरुद्ध असाच पराक्रम केला होता. या सर्व खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये हा विक्रम केला होता. पण औकीब नबीने आता थेट दुलीप ट्रॉफीमध्ये ही कामगिरी केल्यामुळे त्याचे नाव इतिहासात नोंदवले गेले.
4 नोव्हेंबर 1996 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेल्या औकीब नबीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 29 सामन्यांमध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने चार वेळा चार विकेट्स आणि आठ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 29 सामन्यांत 42 विकेट्स आणि 27 टी20 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, या ऐतिहासिक कामगिरीमुळे औकीब नबी अचानक प्रकाशझोतात आला आहे. याआधी तो फारसा परिचित खेळाडू नव्हता. मात्र, दुलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या या कामगिरीमुळे त्याचे नाव सर्वत्र चर्चेत आले आहे. ईस्ट झोनविरुद्धच्या या सामन्यात त्याने 10.1 ओव्हरमध्ये केवळ 28 धावा देत 5 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे त्याचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.