Duleep Trophy 2025: 21 वर्षाच्या पोराचा जलवा! दहा दिवस आधी रणजीमध्ये शतक, आता दुलीप ट्रॉफीतही ठोकलं ताबडतोब शतक; 'दानिश'ची कमाल

Danish Malevar Century: देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी 2025 ची दणक्यात सुरुवात झाली.
Danish Malevar Century
Danish Malevar CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

Danish Malevar Century: देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी 2025 ची दणक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व (Quarter Finals) सामना नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात खेळला जात आहे. तर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात सुरु आहे. हे दोन्ही महत्त्वाचे सामने बंगळुरु येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मैदानावर होत आहेत. याच सामन्यांपैकी एका सामन्यात सेंट्रल झोनच्या 21 वर्षीय फलंदाज दानिश मालेवरने नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले.

दानिश मालेवरची दमदार खेळी

दानिश मालेवरच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर सेंट्रल झोनच्या संघाला एक दमदार सुरुवात मिळाली आहे. मालेवरने या सामन्यात 139 चेंडूंत शानदार शतक झळकावले. त्याने नॉर्थ ईस्टच्या गोलंदाजांना फारशी संधी न देता उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. कर्णधार रजत पाटीदार त्याला चांगली साथ देत असून त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. आता पाटीदारही एक मोठी खेळी खेळण्याच्या उद्देशाने फलंदाजी करत आहे. याआधी, सेंट्रल झोनसाठी आर्यन जुयालनेही अर्धशतक झळकावले होते. त्याने 100 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या, पण दुखापतीमुळे त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदानाबाहेर जावे लागले. नॉर्थ ईस्ट झोनचे गोलंदाज अजूनही विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत.

Danish Malevar Century
Duleep Trophy: विहारीच्या साऊथ झोनने उंचावली ट्रॉफी, रोमांचक फायनलमध्ये वेस्ट झोनचा पराभव

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही शतक

दानिशने यापूर्वीच्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) अंतिम सामन्यात विदर्भ संघासाठी शतक झळकावून खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्या सामन्याच्या पहिल्या डावात मालेवरने 285 चेंडूंमध्ये 153 धावांची जबरदस्त खेळी खेळली होती. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या डावातही त्याने शानदार अर्धशतक झळकावत 73 धावा केल्या होत्या. मालेवरच्या या खेळीच्या जोरावर विदर्भाने केरळला हरवून रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.

Danish Malevar Century
Duleep Trophy मध्येही खिलाडूवृत्तीच्या चर्चेला उधाण; पण कर्णधारानंच केली विरोधी टीमची पाठराखण

ध्रुव जुरेल संघाबाहेर

दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नॉर्थ ईस्ट झोनच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीलाच सेंट्रल झोनच्या संघाला एक मोठा धक्का बसला. संघाचा मुख्य खेळाडू आणि कर्णधार ध्रुव जुरेल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला. जुरेलच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार संघाचे नेतृत्व करत आहे. आता सेंट्रल झोनचा संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com