सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला,'मी अजूनही चूक आहे का? फोटो शेअर करत केला सवाल

फेसबुक पोस्टमध्ये सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी लिहिले की, 'मी अजूनही चूक आहे का? हे हिंदुत्व असू शकते का?'' यासोबतच त्यांनी अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये काही लोक भाजपचा झेंडा घेऊन धार्मिक घोषणा देताना दिसत आहेत.
खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नैनितालमधील रामगढ येथे असणाऱ्या घराची तोडफोड करत आग लावण्यात आली आहे.
खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नैनितालमधील रामगढ येथे असणाऱ्या घराची तोडफोड करत आग लावण्यात आली आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस (Congress) नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नव्या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद संपण्याचे चिन्हे दिसत नाही. खुर्शीद यांच्या नैनितालमधील रामगढ येथे असणाऱ्या घराची तोडफोड करत आग लावण्यात आली आहे. खुद्द सलमान यांनी फेसबुकवर (Facebook) ही माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत कोणत्या संघटनेचा हात आहे, याचा तपास सुरू असल्याचे डीआयजी कुमाऊंच्या वतीने सांगण्यात आले.

खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नैनितालमधील रामगढ येथे असणाऱ्या घराची तोडफोड करत आग लावण्यात आली आहे.
'मी हिंदुत्वाला कधीच दहशतवादी संघटना म्हटले नाही': सलमान खुर्शीद

सलमान खुर्शीद यांनी नुकतेच 'सनराईज ओव्हर अयोध्या' नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली आहे. यासोबतच त्यांनी हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक असल्याचे सांगितले आहे. फेसबुक पोस्टमध्ये सलमान खुर्शीद यांनी लिहिले की, 'मी अजूनही चूक आहे का? हे हिंदुत्व असू शकते का?'' यासोबतच त्यांनी अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये काही लोक भाजपचा झेंडा घेऊन धार्मिक घोषणा देताना दिसत आहेत.

दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या

खुर्शीद यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आता असा वाद सुरू आहे, याला लाज हा अत्यंत कुचकामी शब्द आहे. शिवाय, मला अजूनही आशा आहे की एक दिवस आपण एकत्र तर्क करू शकू आणि असहमत होणारे देखील त्यावेळी सहमती देतील.” खुर्शीद यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये नैनितालमधील त्यांच्या निवासस्थानाच्या खिडकीचे तुकडे आणि जळालेले दरवाजेही दिसत आहेत.

खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नैनितालमधील रामगढ येथे असणाऱ्या घराची तोडफोड करत आग लावण्यात आली आहे.
हिंदुत्व हे ISIS आणि बोको हरामशी सारखे; सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात टिप्पणी

शशी थरूर यांनी या घटनेचा केला निषेध

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे लज्जास्पद आहे. सलमान खुर्शीद हे एक राजकारणी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा गौरव केला आहे, त्यांचा देशाविषयी नेहमीच उदारमतवादी, मध्यवर्ती, सर्वसमावेशक दृष्टीकोन राहिला आहे. आपल्या राजकारणातील असहिष्णुतेच्या वाढत्या पातळीचा सत्तेत असलेल्यांनी निषेध केला पाहिजे."

पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

रविवारी भाजप आमदार राजा सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. राजा सिंह यांनी काँग्रेस नेत्यावर "हिंदूंची बदनामी" केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com