'मी हिंदुत्वाला कधीच दहशतवादी संघटना म्हटले नाही': सलमान खुर्शीद

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) हे त्यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' (Sunrise over Ayodhya) या पुस्तकावरुन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
Salman Khurshid
Salman KhurshidDainik Gomantak

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) हे त्यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' (Sunrise over Ayodhya) या पुस्तकावरुन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना बोको हराम आणि आयएसआयएसच्या (ISIS) जिहादी इस्लामशी केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. मात्र, या चिघळलेल्या वादावर आता सलमान खर्शीद यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान आपल्या स्पष्टीकरणात सलमान खर्शीद म्हणाले की, 'मी कधीही हिंदुत्वाला दहशतवादी संघटना म्हटलेले नाही. हे पुस्तक लिहिण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत होतो. खुर्शीद पुढे म्हणाले, 'मी या पुस्तकात लिहिले आहे की, जे लोक हिंदू धर्माचा गैरवापर करतात, ते ISIS आणि बोको हरामचे समर्थक आहेत. माझ्या पुस्तकात दहशतवादी हा शब्द कुठेच नाही.'

'माझ्या पुस्तकात श्रीरामाचा उल्लेख आहे'

ते पुढे म्हणाले, 'माझ्या पुस्तकात महात्मा गांधींचा उल्लेख आहे. श्रीरामाचा उल्लेख आहे. हे संपूर्ण रामायणाचे सार आहे. पण हिंदू धर्माला मानणारे लोक यावर बोलत नाहीत.'' सलमान खुर्शीद म्हणाले, ''माझा पक्ष काय म्हणतो, काय करतो आणि विचार करतो तेच मी माझ्या पुस्तकात नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने हे बोलू नका असे म्हटले तर अर्थातच मी तसे म्हणणार नाही, पण पक्षाने या पुस्तकाला पाठिंबा दिला आहे.

Salman Khurshid
हिंदुत्व हे ISIS आणि बोको हरामशी सारखे; सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात टिप्पणी

ते म्हणाले, 'मी माझ्या पुस्तकात हिंदुत्वाचे कौतुक केले असून ते पुढे घेऊन गेले पाहिजे यावर भर दिला आहे.' सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स' या अयोध्या निकालावरील पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन झाले. मात्र, या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. दरम्यान, उजव्या विचारसरणीच्या हिंदू सेनेने खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादी गटांनी केलेल्या जिहादी इस्लामशी करुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शुक्रवारी केला.

'विरोधक हिंदूंविरुद्ध द्वेषाचे जाळे विणत आहेत'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल (Governor Anil Baijal) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना लिहिलेल्या पत्रात हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले की, पुस्तकात केलेली तुलना हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याचवेळी विरोधी पक्ष कोळ्याप्रमाणे हिंदूंविरुद्ध द्वेषाचे जाळे विणत असल्याचा आरोप करत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही खुर्शीद यांच्या वक्तव्याला विरोध केला आणि त्यांचे विधान तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आणि अतिशयोक्ती असल्याचे म्हटले. दुसरीकडे, खुर्शीद यांनी आपल्या टीकेवर ठाम राहून हिंदुत्वाचा सनातन धर्माशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हिंदुत्वाने हिंदू धर्म बाजूला ठेवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com