Asia Cup 2025 Winner Prediction: आशिया कप कोण जिंकणार? आकाश चोप्राचे भाकित चर्चेत! म्हणाला...

Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत.
Asia Cup 2025 Winner Prediction
Asia Cup 2025 Winner PredictionDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया कप २०२५ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत आणि प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम संघासह मैदानात उतरायला सज्ज आहे. या महिन्याभराच्या स्पर्धेतील सामने चाहत्यांसाठी उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे.

या आशिया कपसंबंधी अनेक दिग्गज खेळाडूंनी आपापले भाकित मांडले आहे. त्यात माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राचे नावही आहे. आकाश चोप्राने आपल्या भाकितात भारताला आशिया कप २०२५ चे विजेते ठरवले आहे.

Asia Cup 2025 Winner Prediction
Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

त्याचबरोबर त्यांनं संघातील काही प्रमुख खेळाडूंची कामगिरीही सांगितली आहे. आकाशच्या मते, अभिषेक शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल, तर वरुण चक्रवर्ती सर्वाधिक विकेट्स घेईल. तसेच, हार्दिक पंड्या मालिकावीराचा किताब जिंकेल असा भाकीत त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय संघाची ताकद या स्पर्धेत अधोरेखित होते. संघात अनेक अनुभवी आणि महान खेळाडू आहेत जे एका संघाच्या रूपात जोरदार कामगिरी करू शकतात. इतिहास पाहिला तर भारताने आतापर्यंत ८ वेळा आशिया कप जिंकला आहे आणि टीम इंडिया या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.

Asia Cup 2025 Winner Prediction
Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युनायटेड अरब अमीरात विरुद्ध होणार आहे. दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळेल, जो नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्साहवर्धक ठरतो. आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाची कामगिरी आणि त्यांचे विजयाचे दावेदारी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com