India vs Pakistan: हाय होल्टेज सामन्यात 'मिस्टर 360' रचणार इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा जगातील पाचवा फलंदाज बनेल; फक्त...

Asia Cup 2025 India vs Pakistan: आशिया कप २०२५ मध्ये, २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-४ सामना खेळला जाईल, ज्यामध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी असेल.
Suryakumar Yadav 150 Sixes Record
Suryakumar Yadav 150 Sixes RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2025 IND vs pak Suryakumar Yadav T20 Record

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना २१ सप्टेंबर रोजी रंगणार असून, या हाय-व्होल्टेज सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणेच भारत-पाकिस्तानची लढत ही केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता भावनांचा संग्राम ठरते. दोन्ही संघांचे चाहते आपल्या-आपल्या संघाला विजय मिळावा यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

या सामन्यातील सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव. त्याच्याकडे एक विशेष विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे. आत्तापर्यंत सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १४८ षटकार लगावले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या या सुपर फोर सामन्यात तो आणखी दोन षटकार मारण्यात यशस्वी ठरला, तर तो १५० षटकारांचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरेल.

Suryakumar Yadav 150 Sixes Record
Goa History: गोवा मुक्तीसाठी कुख्यात डाकू 'मानसिंह'ची धडपड! पोर्तुगीजांना हाकलण्यासाठी भारत सरकारला लिहिलं होतं पत्र, वाचा संपूर्ण कहाणी

सध्या हा पराक्रम फक्त रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०५ षटकारांसह अव्वलस्थानी असून, जगातला एकमेव फलंदाज आहे ज्याने २०० हून अधिक षटकार मारले आहेत.

याशिवाय, मोहम्मद वसीम (१८३), मार्टिन गुप्टिल (१७३), जोस बटलर (१७१), निकोलस पूरन (१४९) या खेळाडूंनीही मोठ्या प्रमाणात षटकार मारत आपली छाप उमटवली आहे. सूर्यकुमार यादव सध्या १४८ षटकारांसह या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादवची टी-२० कारकीर्द अत्यंत दमदार ठरली आहे. त्याच्या सर्वदिशांनी फटकेबाजी करण्याच्या क्षमतेमुळे त्याला ‘मिस्टर ३६०’ ही उपाधी मिळाली आहे. विशेषत: षटकार मारण्यात तो तरबेज आहे आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर सतत दबाव राहतो. पाकिस्तानविरुद्धच्या अशा मोठ्या सामन्यात, प्रचंड दडपणाखाली सूर्यकुमार यादव जर आपली खेळी रंगवू शकला, तर टीम इंडियाचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो.

Suryakumar Yadav 150 Sixes Record
Aamir Khan Goa Visit: 'कहां जा रहें हैं हम? गोवा'! मि. परफेक्शनिस्ट आमीर खान येणार पर्पल फेस्टला; मंत्री फळदेसाईंनी दिले निमंत्रण

भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार नेहमीच वेगळा असतो. या लढतीत घडणारा प्रत्येक विक्रम, प्रत्येक धावा, प्रत्येक विकेट चाहत्यांसाठी ऐतिहासिक ठरतो. त्यामुळेच, सूर्यकुमार यादवने १५० षटकारांचा टप्पा गाठणे हा त्याच्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com