मैदानावर 'फ्लॉप', रिसॉर्टमध्ये 'टॉप'; नऊपैकी सहा दिवस मद्यधुंद अवस्थेत होते इंग्लिश खेळाडू, मॅनेजरच्या खुलाशानं क्रिकेट जगतात खळबळ

AUS vs ENG: क्रिकेट विश्वातील सर्वात मानाची आणि ऐतिहासिक समजली जाणारी 'एशेज' मालिका सध्या इंग्लंड संघासाठी दुस्वप्न ठरत आहे.
England Cricket Team
England Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेट विश्वातील सर्वात मानाची आणि ऐतिहासिक समजली जाणारी 'एशेज' मालिका सध्या इंग्लंड संघासाठी दुस्वप्न ठरत आहे. मैदानातील खराब कामगिरीमुळे आधीच टीकेचे धनी ठरलेल्या इंग्लंड संघाच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. मालिकेदरम्यान इंग्लंडचे खेळाडू नऊपैकी सहा दिवस मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी स्वतः या प्रकाराची कबुली दिल्याने आता खेळाडूंच्या शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुट्ट्यांच्या नावाखाली मौजमजा आणि मद्याचा सेवन

एशेज मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांच्या दरम्यान इंग्लंड संघ नूसा सिटी येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेला होता. दीर्घ दौऱ्याचा थकवा घालवण्यासाठी या ब्रेकचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, याच काळात खेळाडूंनी मर्यादेपेक्षा जास्त मद्यप्राशन केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सुट्ट्यांच्या काळात नऊपैकी सहा दिवस खेळाडू नशेच्या धुंदीत होते, असा आरोप केला जात आहे. मॅनेजर रॉब की हे स्वतः त्यावेळी संघासोबत नव्हते, परंतु माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

England Cricket Team
Goa Crime: पर्वरीमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग! स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'POCSO' अंतर्गत गुन्हा दाखल

चौकशी होणार

रॉब की यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, "जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मालिकेदरम्यान अतिप्रमाणात मद्यप्राशन करत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जरी मला प्राथमिक माहितीनुसार खेळाडूंचे वर्तन योग्य असल्याचे सांगण्यात आले असले, तरी आरोपांची गांभीर्याने चौकशी केली जाईल." इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याच्या तयारीत असून, दोषी आढळल्यास खेळाडूंवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

England Cricket Team
South Goa: दक्षिण गोव्‍यात 12 महिला विजयी! 10 मतदारसंघ होते राखीव; मंत्री शिरोडकरांची कन्‍या शिरोडा मतदारसंघातून विजयी

१० वर्षांपासून विजयाची प्रतीक्षा

गेल्या १० वर्षांपासून इंग्लंडला एशेज मालिका जिंकता आलेली नाही. २०१५ नंतर ऑस्ट्रेलियाने या मालिकेवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेतही ऑस्ट्रेलियाने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर हतबल ठरणारे फलंदाज आणि दिशाहीन गोलंदाजी यामुळे इंग्लंडचे चाहते आधीच नाराज आहेत. अशातच खेळाडूंच्या 'नाईट आऊट' आणि मद्यप्राशनाच्या बातम्यांनी या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com