PM Awas Yojana: 'पंतप्रधान आवास'मुळे तुटले चौघांचे घर; हप्ता बँकेत जमा होताच प्रियकरासोबत पळून गेली पत्नी...

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे प्रकार
PM Awas Yojana
PM Awas YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

PM Awas Yojana: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधले जाते पण या योजनेमुळे येथे चौघांचे घर तुटले आहे. विशेष म्हणजे अशी एक दोन नव्हे तर 4 प्रकरणे समोर आली आहेत.

पंतप्रधान आवास योजनेता हप्ता बँकेत जमा होताच पत्नी आपल्या प्रियकरासह पळून गेली आहे. चार जणांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. आणि आता संबंधित महिलांचे पती वसुलीची नोटीस घेऊन फिरत आहेत.

PM Awas Yojana
Earthquake Zones in India: भारतात 'या' 8 राज्यांना आहे भुकंपाचा सर्वाधिक धोका... जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रे

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएम आवास योजना) उद्देश लोकांना त्यांच्या घरासाठी मदत करणे हा आहे. यातून आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे लोकांची घरे उभी राहतात.

मात्र उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात या योजनेंतर्गत घर बांधले जाण्याऐवजी घर तुटले आहे. झालं असं की, या योजनेंतर्गत 50,000 रुपयांचा पहिला हप्ता जारी झाल्यावर पत्नी पतीला सोडून प्रियकरासह पळून गेली. अशी एक नव्हे तर तब्बल चार प्रकरणे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बाराबंकीमध्ये, शहरी भागासाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे समन्वयक म्हणाले की, पीएम हाऊसिंगसाठी 16 हजार लोकांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. आता यातून 4 जण असे सापडले आहेत की त्यांनी हप्ता मिळूनही काम सुरू केलेले नाही.

तपासाची प्रक्रिया सुरू झाली असता, 4 घरांमध्ये पत्नी पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेल्याचे समोर आले आहे.

PM Awas Yojana
RBI Monetary Policy: कर्जदारांना दिलासा नाहीच! हफ्ता आणखी वाढणार; RBI चे पतधोरण जाहीर

बाराबंकी, सिद्धौर, जैदपूर, बांकी, बेल्हारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली आहे. हप्ता मिळूनही बांधकाम सुरू का झाले नाही? याबाबत चौकशी केली गेली, तेव्हा योजनेचे पैसे बँक खात्यात प्राप्त होताच त्यांच्या पत्नी प्रियकरांसह पळून गेल्याची माहिती पतींनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणांचा तपास सुरू झाला आहे.

आता समस्या अशी निर्माण झाली आहे की, या महिलांकडून संबंधित पैशांची वसुली कशी करायची, असा प्रश्न जिल्हा नागरी विकास यंत्रणेच्या (डुडा) अधिकाऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, दुसरा हप्ता थांबवा, असे त्यांच्या पतींनी आता सरकारी यंत्रणांना सांगितले आहे.

सरकारी यंत्रणेनेही आता ठोस कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. या सर्व महिलांकडून वसुली केल्यानंतर विभाग त्यांना काळ्या यादीत टाकणार आहे, जेणेकरून त्या पुन्हा या योजनेतून घरासाठी अर्ज करू शकणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com