Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Arunachal Pradesh Girl Viral Video: जर तुम्हाला तुमच्याच देशात परदेशी किंवा चिनी म्हटले तर कसे वाटेल? तेही अशा वयात जेव्हा तुमचे वय केवळ खेळण्याचे आणि हसण्याचे आहे.
Arunachal Pradesh Girl Viral Video
Arunachal Pradesh girl says we are Indians in viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

Arunachal Pradesh Girl Viral Video: जर तुम्हाला तुमच्याच देशात परदेशी किंवा चिनी म्हटले तर कसे वाटेल? तेही अशा वयात जेव्हा तुमचे वय केवळ खेळण्याचे आणि हसण्याचे आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर येथील एका लहान चिमुकलीसोबत जेव्हा असा प्रकार घडला, तेव्हा तिच्या निष्पाप डोळ्यात अश्रू आले. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये या चिमुकलीचे बोलणे आणि हात जोडून लोकांकडे विनंती करण्याची तिची पद्धत पाहून देशातील प्रत्येक संवेदनशील नागरिकाला विचार करायला भाग पाडले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Video) ती चिमुकली तिच्या तोडक्या-मोडक्या आणि निष्पाप भाषेत तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करते. ती म्हणते, "हॅलो गाईज, मला एका माणसाने विचारले की तू चायनीज आहेस का? आम्ही भारतीय आहोत, तुम्ही लोकांनी असे बोलू नये. जेव्हा तुम्ही आम्हाला चायनीज म्हणता, तेव्हा आम्हाला खूप राग येतो आणि खूप वाईट वाटते." तिची ही निष्पाप वेदना इथेच संपत नाही.

Arunachal Pradesh Girl Viral Video
Viral Video: ज्या कढईत भजी तळली, त्यातच चहा बनवला! पाकिस्तानी विक्रेत्याचा विचित्र जुगाड चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'हे कधीच सुधरणार नाही'

ती पुढे आपली ओळख सांगताना आवाहन करते की, "आम्ही ईटानगरमध्ये राहतो... प्लीज आम्हाला चायनीज म्हणू नका, आम्हाला इंडियन म्हणा. चायनीज म्हटल्यामुळे आम्हाला खूप दुःखाचा सामना करावा लागतो." व्हिडिओच्या शेवटी जेव्हा ती पुन्हा एकदा हात जोडून 'प्लीज' म्हणते, तेव्हा पाहणाऱ्या प्रत्येकाचे काळजात कालवाकालव होते.

Arunachal Pradesh Girl Viral Video
Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या चेहऱ्याच्या रचनेमुळे आणि वैशिष्ट्यांमुळे अनेकदा स्वतःच्याच देशात वांशिक टिप्पणी आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. कधी त्यांना चिनी म्हटले जाते, तर कधी त्यांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, या लहान मुलीच्या शब्दांनी थेट देशवासीयांच्या मनाला स्पर्श केला आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर प्रेम आणि सहानभूतीचा पूर आला असून लोक या चिमुकलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी "बाळा, ज्याने असे म्हटले तो मूर्ख होता, तू मनाला लावून घेऊ नकोस, तू भारताची शान आहेस" अशा शब्दांत तिचे कौतुक करत तिला पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com