Indian Navy ची दमदार कामगिरी, अरबी समुद्रात पकडले हजारो कोटींचे अमली पदार्थ

Arabian Sea: बोटीतून अटक करण्यात आलेले पाच जण इराणी किंवा पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्याकडून कोणतेही राष्ट्रीयत्वाचे दस्तऐवज मिळालेले नाहीत.
Indian Navy's Operation In Arabian Sea
Indian Navy's Operation In Arabian SeaX, @ANI
Published on
Updated on

Indian Navy's Operation In Arabian Sea:

भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सोबत गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर संयुक्त कारवाई केली.

यादरम्यान एक इराणी बोट थांबवण्यात आली आणि त्यातील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. हे लोक इराण आणि पाकिस्तानमधील असावेत, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. यावेळी त्यांच्याकडून हजारो कोटी रुपयांचे 3300 किलोहून अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

फेडरल अँटी कॉर्कोटिक्स एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबी आणि इतर एजन्सींनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.

बोटीतून अटक करण्यात आलेले पाच जण इराणी किंवा पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय आहे.

एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्याकडून कोणतेही राष्ट्रीयत्वाचे दस्तऐवज मिळालेले नाहीत.

Indian Navy's Operation In Arabian Sea
Tata Memorial Hospital: 100 रुपयांची टॅब्लेट रोखणार दुसऱ्यांदा होणारा कर्करोग, टाटा मेमोरियलच्या डॉक्टरांची किमया

भारतीय नौदलाने, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसह, सुमारे 3300 किलो अवैध (3089 किलो चरस, 158 किलो मेथाम्फेटामाइन, 25 किलो मॉर्फिन) घेऊन जाणारी एक संशयास्पद बोट अडवली, असे भारतीय नौदलाने सांगितले.

हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाणात जप्त केलेले अमली पदार्थ आहेत. अडवलेली बोट आणि त्यातील चालक दलाचे सदस्य तसेच प्रतिबंधित वस्तू भारतीय बंदरातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

Indian Navy's Operation In Arabian Sea
Maanipur Violence: मणिपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

या कामगिरीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, "पीएम मोदींच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या व्हिजनला पुढे नेत, आमच्या एजन्सींना आज देशातील सर्वात मोठी अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आले आहे. एनसीबी, नौदल आणि गुजरात पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 3132 किलो ड्रग्जची मोठी खेप जप्त करण्यात आली. हे ऐतिहासिक यश आपल्या देशाला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या आपल्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचा दाखला आहे. या निमित्ताने मी एनसीबी, नौदल आणि गुजरात पोलिसांचे अभिनंदन करतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com