Amit Kumar, a senior police officer, was abducted from his house by the cadres of Meitei group Arambai Tengol.
Amit Kumar, a senior police officer, was abducted from his house by the cadres of Meitei group Arambai Tengol.

Maanipur Violence: मणिपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Kidnapping of a Police Officer: आरामबाई टेंगोलच्या कार्यकर्त्यांनी इंफाळ पूर्वेतील कुमार यांच्या घरावर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर कुमार यांचे अपहरण केले.
Published on

Senior police officer kidnapped in Manipur:

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर मणिपूरमध्ये तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आसाम रायफल्सच्या चार तुकड्याही इंफाळ पूर्व जिल्ह्यात तैनात कराव्या लागल्या.

विशेष म्हणजे मेईतेई गटाच्या आरामबाई टेंगोलच्या कार्यकर्त्यांनी या पोलीस अधिकाऱ्याचे घरातून अपहरण केले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपहरण झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमित कुमार हे मणिपूर पोलिसांच्या ऑपरेशन विंगमध्ये तैनात आहेत.

अपहरणाची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाने तातडीने कारवाई करत पोलीस अधिकाऱ्याची सुटका केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Amit Kumar, a senior police officer, was abducted from his house by the cadres of Meitei group Arambai Tengol.
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला देशाचे शत्रू का म्हटले? विद्यार्थ्यांना दिला 'हा' मेसेज

घटनेची सविस्तर माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी सात वाजता पोलिस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले.

आरामबाई टेंगोलच्या कार्यकर्त्यांनी इंफाळ पूर्वेतील कुमार यांच्या घरावर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. कुमार यांनी या गटातील सहा जणांना वाहन चोरीच्या प्रकरणात अटक केली होती, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला होता.

Amit Kumar, a senior police officer, was abducted from his house by the cadres of Meitei group Arambai Tengol.
DNA Test: ब्लॅकमेल, धमकी अन् मारहाण... 14 वर्षांपासून डॉक्टरकडून युवतीचे शोषण, कोर्टाकडून डीएनए चाचणीचे आदेश

हल्ला आणि बचावाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती बिघडली आणि राज्य सरकारला लष्कराची मदत घ्यावी लागली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आसाम रायफल्सच्या चार तुकड्या मागवण्यात आल्या आणि घटना घडलेल्या परिसरात तैनात करण्यात आली. घाटी भागात सशस्त्र दल कायदा लागू नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com