VIDEO: "धोनीने माझं करिअर उद्ध्वस्त..." निवृत्तीनंतर भारतीय खेळाडूनं सोडलं मौन, 'माही'बाबत केला मोठा खुलासा

Amit Mishra on MS Dhoni: अमित मिश्रा यांच्या ९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी केवळ ६८ सामने खेळले.
Amit Mishra on MS Dhoni
Amit Mishra on MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट विश्वात 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंचे नशीब चमकले, तर काहींना पुरेशा संधी मिळाल्या नसल्याची ओरड नेहमीच होत असते. लेग स्पिनर अमित मिश्रा हे अशाच नावांपैकी एक, ज्याच्याबद्दल नेहमीच चर्चा रंगते की धोनीमुळे अमित मिश्राचे आंतरराष्ट्रीय करिअर बहरले नाही. मात्र, निवृत्तीनंतर आता स्वतः अमित मिश्राने या वादावर पडदा टाकत एक खळबळजनक खुलासा केला आहे.

अमित मिश्राच्या ९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी केवळ ६८ सामने खेळले. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला संघातून वारंवार आत-बाहेर व्हावे लागले. सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात अनेकदा असा दावा केला जातो की, धोनीने अमित मिश्राकडे दुर्लक्ष केले.

मात्र, एका अलीकडील मुलाखतीत अमित मिश्राने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "लोक म्हणतात की धोनी नसता तर माझे करिअर चांगले झाले असते, पण वास्तव हे आहे की धोनी नसता तर मी संघात आलोच नसतो," अशा शब्दांत त्यांनी धोनीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Amit Mishra on MS Dhoni
South Goa: दक्षिण गोव्‍यात 12 महिला विजयी! 10 मतदारसंघ होते राखीव; मंत्री शिरोडकरांची कन्‍या शिरोडा मतदारसंघातून विजयी

धोनीच्या पाठिंब्यामुळेच पुनरागमन शक्य

त्याने पुढे स्पष्ट केले की, धोनीने केवळ त्यांना संधीच दिली नाही, तर त्यांच्यावर विश्वासही दाखवला. जेव्हा जेव्हा अमित मिश्रा संघातून बाहेर पडला, तेव्हा तेव्हा धोनीच्या नेतृत्वाखालीच त्याने पुन्हा जोरदार पुनरागमन केले.

"मी वारंवार संघात परतलो कारण धोनीचा माझ्या क्षमतेवर विश्वास होता. गोष्टींकडे बघण्याचा हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, जो अनेकजण विसरतात," असेही त्याने नमूद केले.

Amit Mishra on MS Dhoni
Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

२०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका अमित मिश्रा यांच्यासाठी शेवटची ठरली. या मालिकेतील एका प्रसंगाचा उल्लेख करताना मिश्रा म्हणाले की, धोनी केवळ कर्णधार नव्हता तर तो मैदानावर एक मार्गदर्शक होता.

एका निर्णायक सामन्यात जेव्हा मिश्रा केवळ धावा रोखण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा धोनीने जवळ येऊन त्यांना कानमंत्र दिला. त्यानंतर लगेचच मिश्रा यांना विकेट मिळाली. मैदानावरील धोनीच्या टिप्समुळेच आपली कामगिरी सुधारल्याचे त्यांनी मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com