New Governor Of Bihar: हिमाचल प्रदेशनंतर बिहारच्या राज्यपालपदी गोव्याचे सुपुत्र

या आधी भूषवले होते गोवा विधानसभेचे अध्यक्षपद
Governor Of Bihar
Governor Of BiharDainik Gomantak

आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला असून बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदर फागू चौहान हे बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. आता फागू चौहान यांच्याकडे मेघालय राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजेंद्र आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्याची अधिसूचना राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आली आहे. राजेंद्र आर्लेकर हे बिहारचे 41 वे राज्यपाल असतील.

राजेंद्र आर्लेकर मूळचे गोव्याचे आहेत. 2002 ते 2007 पर्यंत ते आमदार आणि 2012 ते 2015 पर्यंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 ते 2017 या काळात ते वन, पर्यावरण आणि पंचायती राज्यमंत्री होते. यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले.

फागू चौहान यांनी 2019 मध्ये बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. दरम्यान, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपला सोडचिठ्ठी देत ​​नितीशकुमार यांनी महाआघाडीशी हातमिळवणी केली.

Governor Of Bihar
Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राष्ट्रपतींनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला; हे असणार नवे राज्यपाल

बिहारमध्ये फागू चौहान यांनी बिहारमध्ये बराच काळ काम केले आहे. दरम्यान फागू चौहान यांचा जन्म 1 जानेवारी 1948 रोजी शेखपुरा,आझमगड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खारपट्टू चौहान होते.

मागासलेल्या जातीतून आलेले फागू चौहान 1985 साली दलित किसान मजदूर पक्षाकडून घोसी विधानसभेतून पहिल्यांदा आमदार झाले आणि येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते सलग सहावेळा घोसी येथून आमदार होते. उत्तर प्रदेशातील मागास जातीचा मोठा चेहरा मानला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com