मुख्यमंत्री योगींनी अयोध्येत काबूल नदीच्या पाण्याने रामलल्लाचा केला जलाभिषेक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवलेली भेट आनंदाने स्वीकारली.
Chief Minister Yogi Adityanath
Chief Minister Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवलेली भेट आनंदाने स्वीकारली. अफगाणिस्तानमधील एका चिमुकलीने काबूल नदीतील पाणी पीएम मोदींकडे पाठवून रामजन्मभूमीचा जलाभिषेक करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौहून अयोध्येला जाऊन रविवारी काबूल नदीचे पाणी गंगाजलात एकत्रित करत रामललाचा जलाभिषेक केला. काबूलमधील या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना रामललावर काबूल नदीचे पाणी अर्पण करण्याची विनंती केली होती. अयोध्येत पोहोचलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही श्री रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम पाहिले. येथे युद्धपातळीवर काम सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीचे जल अभिषेक केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज गंगा नदी आणि अफगाणिस्तानच्या काबुल नदीचे पाणी इथे आले आहे. काबूलमधील एका मुलीने भीतीच्या वातावरणात राहणाऱ्या अफगाणी महिलांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्या सर्व महिला आणि मुलींच्या दु:खाला भारताच्या भावनेशी जोडणारे हे जल मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या जन्मभूमीवर अर्पण करण्याचे सौभाग्य मला मिळाले असल्याचे या मुलीने सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी रामाची नगरी असलेल्या अयोध्येत राम लल्लाची पूजा केली. योगींनी अफगाणिस्तानातून आलेल्या काबूल नदीच्या पाण्याने जलाभिषेक केला. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर एका मुलीने काबूल नदीचे पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले. सीएम योगी आदित्यनाथ यांनी त्याच पाण्याने रामललाची पूजा केली. सीएम योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले की, या काबूल नदीच्या पाण्याचे खूप महत्त्व आहे. या पाण्यापूर्वी रामललाची पूजा करुन नंतर ते राम मंदिराच्या गर्भगृहात अर्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी काबूल नदीचे पाणी शिंपडले. वैदिक मंत्रोच्चाराच्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काबूल नदीचे पाणी गंगेच्या पाण्यात मिसळले. यावेळी त्यांनी सांगितले की, काबूलमधील एका मुलीने काबूल नदीचे पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. राम मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी काबूल नदीचे पाणी शिंपडावे, अशी इच्छा तिच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. सीएम योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अयोध्येत रामायण कॉन्क्लेव्हचाही समारोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com