काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधानांना कृषी कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना 'माफिवीर' बनून देशातील तरुणांची आज्ञा पाळावी लागेल. 'अग्निपथ' परत घ्यावी लागेल. (Agneepath scheme Congress president Sonia Gandhi oppose government on new army recruitment scheme)
दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) या त्रिकुटांनी लष्कर भरतीप्रकरणी ‘मोदी-शहा’ यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. 'अग्निपथ' योजना पूर्णपणे दिशाहीन असल्याचे सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. अनेक माजी सैनिक आणि संरक्षण तज्ज्ञांनीही या योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोनिया गांधींनी तरुणांना आवाहन केलं
सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, केंद्र सरकारला सैन्यात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी आपला संदेश पक्षाचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांच्या माध्यमातून तरुणांना दिला आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची तरुणांची इच्छा आहे. लष्करात लाखो रिक्त पदे असूनही गेल्या तीन वर्षांपासून भरती न झाल्याची मी समजू शकते. एअरफोर्समध्ये भरती परीक्षा देऊन निकाल आणि नियुक्तीची वाट पाहणाऱ्या तरुणांबद्दलही मला पूर्ण सहानुभूती आहे. तुमच्या आवाजाकडे दुर्लक्ष करुन सरकारने 'नवीन सैन्य भरती योजना' जाहीर केली याचे मला वाईट वाटते. ही योजना पूर्णपणे दिशाहीन आहे.
सोनिया पुढे गांधी म्हणाल्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. खर्या देशभक्ताप्रमाणेच सत्य, अहिंसा, संयम आणि शांतता या मार्गावर चालत पक्ष युवकांचा आवाज सरकारसमोर बुलंद करेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.