नवनीत राणांना अटकेचे संसदेत पडसाद; लोकसभा अध्यक्षांनी मागवली माहिती

महाराष्ट्रात आरोप - प्रत्यारोपाची मालिका संपता संपेना
Navneet Rana
Navneet RanaDainik Gomantak
Published on
Updated on

गेले तीन - चार दिवस महाराष्ट्रात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात खडाजंगी सुरू असून दोन्ही गटातील आरोप - प्रत्यारोपाची मालिका संपता संपत नाही. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. मात्र, सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे. ( after Navneet Rana arrest loksabha speaker asked for details )

Navneet Rana
Jahangirpuri हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याची मागणी SCने फेटाळली

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून येत्या २४ तासात सविस्तर माहिती मागवली आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे.एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानूसार गृहमंत्रालया मार्फत ही माहिती मागवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Navneet Rana
फक्त दोन दिवस थांबा! कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणीसाठी SC सज्ज

नवनीत राणा यांनी पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं आहे ?

“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. मात्र माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे. अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com