फक्त दोन दिवस थांबा! कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणीसाठी SC सज्ज

Karnataka Hijab Raw: कर्नाटकमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी पार पडणार आहे.
High Court of Karnataka
High Court of KarnatakaDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या महिन्यात, कर्नाटकातील उडुपी (Udupi) येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी महिला महाविद्यालयात हिजाबच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. ज्याचा निषेध संपूर्ण देशात (India) पोहोचला आणि आज हिजाबच्या वादावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. (Just wait two days Supreme Court ready for hearing in Karnataka hijab case)

High Court of Karnataka
Gurugram Fire: मानेसरमध्ये भीषण आग लागून अनेक झोपड्या जळून खाक

कर्नाटकात (Karnataka) हिजाबचा वाद इतका टोकाला गेला की तो राज्याबरोबरच देश आणि राजकारणातही पसरला आहे. कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घातल्याने बरीच निदर्शने झाली, ज्यावर राजकीय वक्तृत्व आणि निषेध अजूनही सुरू आहेत. हिजाबच्या (Hijab) मुद्द्यावरून देशात वेगवेगळ्या ठिकाणी वादाचे वातावरण इतकं चिघळलं आहे.

कर्नाटकमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लवकरच सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, दोन दिवस थांबा, त्यानंतर सुनावणी कधी होणार हे ठरवूयात. खरेतर, याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता मीनाक्षी अरोरा यांनी हिजाब बंदी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, आज नाही, दोन दिवस थांबा. मी प्रकरणाची यादी करणार आहे.

High Court of Karnataka
Jahangirpuri हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याची मागणी SCने फेटाळली

याआधीही कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (High Court of Karnataka) विशेष खंडपीठाने विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावली होती. हिजाब घालणे हा इस्लामचा अनिवार्य भाग नाहीये, असेही खंडपीठाने नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर, कर्नाटक सरकारने वर्गात हिजाब घालण्यावर बंदी घातली आणि घोषणा केली की विद्यार्थी आणि शिक्षकांना हिजाब परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस कर्नाटकातील शाळा-कॉलेजांमध्ये हिजाबचा वाद सुरू झाला. यानंतर हिजाबबाबत अनेक राज्यांमध्ये निदर्शने झाल्याचे दिसून आले. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यायची की नाही, यावरून वाद सुरू झाला. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि हिंसाचारानंतर हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com