Delhi MCD: MCD मधील निर्वाचित नगरसेवकांपैकी निम्मे नगरसेवक 5 वी ते 12वी पास, ADR रिपोर्ट

Delhi MCD Election Result: निम्म्या नगरसेवकांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 5 वी ते 12 वी उत्तीर्ण असल्याचे जाहीर केले आहे.
Voter
VoterDainik Gomantak

Delhi MCD Election Result: दिल्ली महानगरपालिकेच्या 250 नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी जवळपास निम्म्या नगरसेवकांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 5 वी ते 12 वी उत्तीर्ण असल्याचे जाहीर केले आहे. तर 66 टक्के नगरसेवक हे 41 ते 70 वयोगटातील आहेत.

दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि दिल्ली इलेक्शन वॉचने 248 नवनिर्वाचित MCD नगरसेवकांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. दोन उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र स्पष्ट नसल्याने आणि पूर्ण उपलब्ध नसल्याने त्यांचे विश्लेषण होऊ शकले नाही. 248 एमसीडी कौन्सिलर्सपैकी 132 (53 टक्के) महिला असून एक ट्रान्सजेंडर आहे.

Voter
Delhi MCD Election Result: दीड दशकाच्या भाजप सत्तेला आपचा सुरूंग;दिल्ली महापालिकेत 'केजरीवाल' सरकार

इतकंच नाही, तर एडीआरच्या अहवालानुसार, एमसीडीमध्ये किमान 17 टक्के नवनिर्वाचित नगरसेवकांनी स्वत:विरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत, तर आणखी 8 टक्के ‘गंभीर’ खटल्यांचा सामना करत आहेत. 2017 च्या निवडणुकीत 266 नगरसेवकांपैकी 10 टक्‍क्‍यांनी फौजदारी प्रकरणे घोषित केली होती, तर आणखी 5 टक्‍क्‍यांनी त्यांच्या निवडणूक (Election) शपथपत्रात गंभीर प्रकरणे जाहीर केली होती. 2017 मध्ये तत्कालीन तीन महापालिकांच्या 270 प्रभागात निवडणुका झाल्या. या वर्षाच्या सुरुवातीला सीमांकन झाल्यानंतर, एमसीडीमधील प्रभागांची संख्या 250 वर आली आहे.

तसेच, ट्रान्सजेंडर बॉबी सुलतानपुरी-ए वॉर्डमधून आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) तिकिटावर विजयी झाला आहे. 2017 मध्ये, 266 नगरसेवकांसाठी डेटा उपलब्ध होता, त्यापैकी 139 (52 टक्के) महिला होत्या. 2017 मध्ये, 272 प्रभागांसह तीन उत्तर, पूर्व आणि दक्षिण महामंडळे होती. या वर्षी तिन्ही महामंडळांचे एकात विलीनीकरण झाले आणि परिसीमन झाल्यानंतर प्रभागांची संख्या 250 वर आली.

Voter
MCD Election: MCD निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांनी कॉंग्रेसला तारलं, 'आप' ची विक्रमी आघाडी

अहवालानुसार, 126 (51 टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 5 वी ते 12 वी उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे. तर 116 (47 टक्के) उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता पदवी किंवा त्याहून अधिक असल्याचे घोषित केले आहे. विजयी उमेदवारांपैकी चार उमेदवार डिप्लोमा असून दोन नगरसेवक निरक्षर आहेत. त्याचबरोबर, 84 (34 टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांचे वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान घोषित केले आहे, तर 164 (66 टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांचे वय 41 ते 70 वर्षे दरम्यान घोषित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com