Assembly Election 2022: 'ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसला गोव्यात कमकुवत केलं'

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Adhir Ranjan Chowdhury
Adhir Ranjan ChowdhuryDainik Gomantak

पाच राज्यांतील पराभवानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले होते. याच पाश्वभूीमर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना चौधरी यांनी ममता बॅनर्जींना 'वेडे' म्हटले आहे. पाच राज्यांतील पराभवावर ममता बॅनर्जींनी काँग्रेसला (Congress) सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यास प्रत्युत्तर देत अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी ममता यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. (Adhir Ranjan Chowdhury has said that Mamata Banerjee has weakened the Congress in Goa)

दरम्यान, चौधरी म्हणाले, 'वेड्या माणसाला उत्तर देणे योग्य नाही, संपूर्ण भारतात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. ममता बॅनर्जी यांच्याकडे एवढे आमदार आहेत का? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते काँग्रेसकडे आहेत. त्यांच्याकडे आहेत का? काँग्रेस नसती तर त्यांच्यासारखे नेते निर्माण झालेच नसते.'

Adhir Ranjan Chowdhury
पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसचे राज्यसभेतही नुकसान?

अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, 'ममता बॅनर्जी भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचे एजंट म्हणून काम करण्यासाठी हे बोलत आहेत.'

तसेच चौधरी पुढे म्हणाले, 'त्या (Mamta) काँग्रेसविरोधात का टिप्पणी करत आहेत? काँग्रेस नसती तर ममता बॅनर्जीं यांचीसारखी माणसं नसती. हे त्यांनी लक्षात ठेवावे. भाजपला खूश करण्यासाठी त्या गोव्यात गेल्या. त्यातून त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. दीदींनी गोव्यात काँग्रेस कमकुवत केलं, हे सर्वांना माहीत आहे.'

Adhir Ranjan Chowdhury
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांची उद्या शिखर बैठक

काँग्रेसला एकत्र ठेवण्यात अर्थ नाही

विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सांगितले की, 'भाजपविरोधी आघाडीसाठी काँग्रेसला प्रादेशिक पक्षांसोबत एकत्र ठेवण्यात काही अर्थ नाही.'

बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "मला वाटते की भाजपशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही.''

काँग्रेसने विश्वासार्हता गमावली

बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "आता काँग्रेस सर्वत्र हरत आहे. त्यांना (Congress) आता जिंकण्यात काही रस आहे, असं वाटत नाही. त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमावली असून आता त्यांच्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही.'' त्याचवेळी, 'दीदीं'च्या धारदार वक्तव्यावर तात्काळ प्रत्युत्तर देताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची (Mamta) भूमिका एकच असल्याचे म्हटले होते. मोदींना 'काँग्रेस-मुक्त भारत' हवा असून ममता काँग्रेसशिवाय विरोधी आघाडीची चर्चा करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com