
Actress Rakhi Sawant Viral Video: आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच मुंबईत परतलेली राखी परत येताच पुन्हा एकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहेत. राखीच्या या ताज्या व्हिडिओमुळे यूजर्स आता तिला 'बिग बॉस 19'मधील तान्या मित्तलच्या पावलावर पाऊल ठेवणारी' म्हणत तिची खिल्ली उडवत आहेत. तान्या मित्तलनेही आपल्या मोठ्या-मोठ्या बोलण्याने सर्वांना थक्क केले.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये राखी सावंत थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याबद्दल बोलत आहे. विशेष म्हणजे तिचे बोलणे ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
चकाकदार ड्रेसमध्ये दिसणारी राखी सावंत (Rakhi Sawant) व्हिडिओमध्ये अतिशय आत्मविश्वासाने म्हणते, "थँक्यू पापा डोनाल्ड ट्रम्प! माझे डोनाल्ड पापा माझ्यासाठी सगळं काही करतात. त्यांनी माझ्यासाठी नुकताच अमेरिकेत एक खूप मोठा बंगला बांधला आहे. थँक्यू पापा डोनाल्ड."
या दरम्यान, कोणीतरी तिला काहीतरी विचारते, त्यावर उत्तर देताना राखी पुन्हा स्पष्ट करते, "बँगलोर नाही... बंगलो (Bungalow)!" राखी सावंतचा हा व्हिडिओ आता खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राखी इथेच थांबली नाही, तर ती पुढे सांगते, "मी लंडनला जात आहे, अमेरिकेला जात आहे. पापा डोनाल्ड ट्रम्प यांनी मला माझी फेव्हरेट कार भेट दिली आहे. ट्रम्प माझे पप्पा आहेत."
राखी सावंतच्या या व्हिडिओवर यूजर्स भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत आणि यात तान्या मित्तल हिच्या नावाचा उल्लेख करुन तिची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. अनेक यूजर्सचे म्हणणे आहे की, राखी या व्हिडिओद्वारे तान्या मित्तललाच अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत आहे.
एका युजरने कमेंट केली, "तान्या मित्तल प्रो."
तर दुसऱ्याने गंमत केली, "अमेरिकेची पुढील प्रेसिडेंट राखी ट्रम्प."
एका युजरने तर स्पष्टच लिहिले, "ही तान्या मित्तलपासून काही जास्तच प्रेरित झाली आहे."
काहींनी 'बिग बॉस'च्या घरात नक्कीच ड्रामा होणार, असे संकेतही दिले.
राखी सावंत जेव्हापासून मुंबईत परतली आहे, तेव्हापासून ती पुन्हा एकदा 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. राखीने यापूर्वी 'बिग बॉस'चे तीन सीझन्स गाजवले आहेत. ती पहिल्या सीझनमध्ये, त्यानंतर 'बिग बॉस 14' आणि 'बिग बॉस 15' मध्येही दिसली होती. आता निर्माते मनोरंजनाचा तडका देण्यासाठी तिला चौथ्यांदा शोमध्ये आणू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. जर राखीने यावेळी शोमध्ये एन्ट्री घेतली, तर ती रिॲलिटी शोचा भाग होण्याची ही चौथी वेळ असेल. राखी जिथे असते, तिथे ड्रामा पाहायला मिळतो, त्यामुळे प्रेक्षकही तिच्या एन्ट्रीसाठी खूप उत्सुक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.