Kumar Vishwas: कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी, केजरीवाल यांच्या विरोधात न बोलण्याचा इशारा

कुमार विश्वास यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाष्य न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Kumar Vishwas Threat News:
Kumar Vishwas Threat News: Dainik Gomantak

Kumar Vishwas Threat News:  कवी कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांना धमकी ई-मेल मिळाला असल्याची माहिती त्यांच्या व्यवस्थापकाने दिली आहे. कुमार विश्वास यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर भाष्य न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गुजरात विधानसभा आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीदरम्यान ही धमकी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Kumar Vishwas Threat News:
IFFI Goa Opening Ceremony Pictures: इफ्फीचा भव्य उद्धाटन समारंभ, जगभरातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती

कुमार विश्वास यांचे व्यवस्थापक प्रवीण पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. विश्वास यांना प्राप्त झालेल्या धमकीच्या मेलमध्ये श्री रामाबद्दल अत्यंत अपमानास्पद गोष्टी बोलण्यात आल्या असून, त्यांचा गौरव करू नका असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाष्य न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहीद उधम सिंह यांची शपथ घेतो की मी तुम्हाला ठार मारीन. अशी धमकी व्यक्तीने ई-मेलद्वारे दिली आहे.

दरम्यान, कुमार विश्वास यांच्या कार्यालयाच्या वतीने याबाबत गृह मंत्रालय आणि सुरक्षा एजन्सीला माहिती देण्यात आली आहे. तसेच, कुमार विश्वास यांनी देखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"आता त्यांना आणि त्यांच्या चिंटूला माझा राघवेंद्र सरकार श्री रामाचा गौरव करणं आवडत नाही. मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ते ठीक आहे, पण तुमच्या चिंटूला सांगा की, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाला शिव्या देऊ नका. तुमचे काम करा, नाहीतर लक्षात ठेवा, रावणाची देखील घराणेशाही उरली नाही, मग तू कोण लवणासुर आहेस?

Kumar Vishwas Threat News:
Video: गुजरातमधील विकासकामांसाठी या महिलेने दिला PM मोदींना आशीर्वाद, 'समुद्रात पाणी असेपर्यंत...'

कुमार विश्वास यांच्या वतीने गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com