PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

Video: गुजरातमधील विकासकामांसाठी या महिलेने दिला PM मोदींना आशीर्वाद, 'समुद्रात पाणी असेपर्यंत...'

PM Narendra Modi: पीएम मोदी सध्या जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.
Published on

PM Narendra Modi: पीएम मोदी सध्या जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. केंद्रात तसेच राज्य पातळीवर भाजप सरकार राबवत असलेल्या विविध योजना हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. जनसामान्यांमधील या लोकप्रियतेचे आणखी एक उदाहरण तेव्हा दिसले जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये गुजरातमधील एक महिला पंतप्रधान मोदींना त्यांच्या विकासकामांसाठी आशीर्वाद देताना दिसत आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमधील गुजराती महिला गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. या महिलेने म्हटले की, हे सरकार आमची काळजी घेते. 1250 रुपयांत एक महिन्याचे राशन मिळते.

PM Narendra Modi
Gujrat Assembly Elections: गुजरात निवडणुकीतील PM मोदींच्या मॅरेथॉन रॅलींना आजपासून सुरुवात

दुसरीकडे, मोदी सरकारने हाती घेतलेल्या योजना जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी गेम-चेंजर ठरल्या आहेत. तळागाळातील लोकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या योजनांचा करोडो भारतीयांना फायदा झाला आहे.

PM Narendra Modi
Arvind Kejriwal: गुजरात निवडणूक लढवू नका, 'या' मंत्र्याला सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवालांचा गौप्यस्फोट

तसेच, विविध योजनांतर्गत पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक (Bank) खात्यात हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मदत झाली आहे. या योजनांनी भारतातील (India) ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीबांना सशक्त केले.

शिवाय, स्वच्छ भारत, उज्ज्वला योजना, हर घर जल मिशन, पीएम आवास योजना, अटल पेन्शन योजना इत्यादी योजनांनी देशातील गरिबांचे जीवनमान सुधारण्याची हमी दिली आहे. व्हायरल व्हिडीओतील या महिलेप्रमाणे लोक त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या नेत्याला आशीर्वाद देतात, यात काही एक शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com