Viral Video: नाद करा, पण आमचा कुठं? पठ्ठ्याने एकाच रोपावर पिकवले टोमॅटो आणि बटाटे

Grafting: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती आपली डेमो फार्मिंग कशी दाखवत आहे हे तुम्ही पाहू शकता.
A video of a person growing tomatoes and potatoes on the same plant  called crop 'pomato' going viral.
A video of a person growing tomatoes and potatoes on the same plant called crop 'pomato' going viral.Instagram, Agrotill
Published on
Updated on

A video of a person growing tomatoes and potatoes on the same plant called crop 'pomato' going viral:

अलिकडील काळात शेती क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळत आहे. काही लोक, अंगणात, घराच्या परिसरात तर काही लोक गच्चीवर शेती करताना दिसतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात लोक त्यांच्या घराच्या गच्चीवर मोठ्या प्रमाणात शेती करताना दिसत आहेत.

पण सध्या एकाच रोपावर टोमॅटो आणि बटाटे पिकवलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्यक्तीने पिकाला ‘पोमॅटो’ असे नाव दिले आहे. यामध्ये तुम्हाला एकाच रोपात टोमॅटो आणि बटाटे कसे उगवले जातात हे पाहता येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती आपली डेमो फार्मिंग कशी दाखवत आहे हे तुम्ही पाहू शकता.

नवीन तंत्र वापरून त्याने टोमॅटो आणि बटाट्याचे पीक एकत्र घेतल्याचे तो सांगत आहे. यामध्ये तुम्ही टोमॅटो आणि बटाटे पिकवलेले पहाता येईल.

पीक घेण्याच्या या पद्धतीमुळे कमी जागेत जास्त पीक घेता येते असे तो सांगत आहे. याशिवाय नफाही दुप्पट आहे. ग्राफ्टिंग (कलम) करून हे पीक घेतल्याचे व्हिडिओमधील व्यक्ती सांगत आहे.

A video of a person growing tomatoes and potatoes on the same plant  called crop 'pomato' going viral.
Viral Video: शाब्बास रे वाघा! वाघाने पाण्यातून बाहेर काढली प्लास्टिकची बाटली, पाहा मनं जिंकणारा व्हिडिओ

या व्यक्तीचा हा व्हिडिओ ॲग्रोटिल नावाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने व्यक्तीने हा पराक्रम साधला त्याला ग्राफ्टिंग म्हणतात.

ग्राफ्टिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन लहान वनस्पतींचे देठ एकत्र जोडले जातात आणि त्यातून एक नवीन वनस्पती वाढते. या प्रक्रियेतून मूळ रोपापेक्षा जास्त उत्पादन मिळते.

A video of a person growing tomatoes and potatoes on the same plant  called crop 'pomato' going viral.
Viral Video: 'Rapido' बाईकमधील पेट्रोल संपले, पण कस्टमर काही खाली उतरलाच नाही

ग्राफ्टिंग करून तयार केलेल्या रोपांची खास गोष्ट म्हणजे ग्राफ्टिंग केलेल्या दोन्ही पीकांचे गुणधर्म सारखेच असतात. असे नाही की फक्त टोमॅटो आणि बटाटे ही पीकेच एकत्र घेतली जाऊ शकतात. या प्रक्रियेद्वारे, लोक सफरचंद, संत्री किंवा अनेक फुलांचे ग्राफ्टिंगद्वारे उत्पादन घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com