Students handling and enjoying many things related to agriculture
Students handling and enjoying many things related to agricultureGomantak Digital Team

Agriculture Class : नेस्टर रेंजल फार्ममध्ये मुले घेतात शेतीचे धडे...

शेतीविषयी माहिती गोळा करून प्रत्यक्ष शेतीचे धडे घेण्यातून विद्यार्थी शेतीसंबंधात अनेक गोष्टी हाताळतात व आनंद लुटतात.
Published on

सपना सामंत

शेतीसंबंधित शिक्षणाला आज फार महत्त्व आले आहे. धान्यशेतीबरोबरच, पशुशेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे शेतीप्रकार अस्तित्वात आहेत. शाळा-काॅलेजच्या विद्यार्थीं वर्गांमध्येसुध्दा शेतीसंबंधाने जागृती केली जात आहे. कृषी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या आज वाढते आहे.

ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रात असलेल्या प्रसिध्द नेस्टर रेंजल फार्म हाऊसवर अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी शेतीचे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. शेतीविषयी माहिती गोळा करून प्रत्यक्ष शेतीचे धडे घेण्यातून विद्यार्थी शेतीसंबंधात अनेक गोष्टी हाताळतात व आनंद लुटतात. 

Students handling and enjoying many things related to agriculture
Blog: कामसू हात, स्वाभिमानी मान आणि प्रेमळ मन

या फार्ममध्ये दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कोंबडीपालन, मत्स्यपालन, भाजीपाला लागवड व इतर लागवड केलेली आहे. हॉर्टिकल्चर, ग्राफ्टिंग, प्लांट नर्सरीचा इथे प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या ठिकाणी विद्यार्थी प्रत्यक्षरित्या शेतात उतरून शेतीचे धडे घेतो. सध्या आंब्याचा मोसम असल्याने आंबे कशे उतरवावेत याबद्दलही फार्ममध्ये प्रात्यक्षिक दिले जात आहे.

‘शेतात लागवड व पेरणीचा प्रत्यक्ष अनुभव घेल्याशिवाय त्याचे महत्त्व कळू शकणार नाही. अशा प्रकारचे अनुभव प्रत्येकांनी, विशेषत: विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’मध्ये देखील शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. मुलांना लहान वयातच शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी अनेक ठिकाणी अशाप्रकारचा अभ्यासक्रम राबविण्यात आला आहे.

Students handling and enjoying many things related to agriculture
Blog: स्तुती, निंदा आणि त्यांचे प्रयोजन

जोपर्यंत शेतीची आवड निर्माण होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष शेती कशी करणार? त्यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शेतीसंबंधाने रस निर्माण केला पाहिजे तरच ते शेती गांभीर्याने घेतील’ असे माजी कृषी उपसंचालक जॉकिम डिसोझा म्हणतात.

यावेळी बोलताना नेस्टर रेंजल म्हणतात, ‘सर्वांनी पृथ्वी आणि मातीचा आदर केला पाहिजे. एकदा तरी शेतात प्रत्यक्ष उतरून अनुभव घेतल्याशिवाय शेतीचे महत्त्व कळत नाही. शाळेतील मुलांना बऱ्याचदा पर्यावरणीय विज्ञानाबद्दल सैद्धांतिक ज्ञान दिले जाते. या ज्ञानाचा फायदा मुलांनी योग्य तऱ्हेने जर करून घ्यायचा असेल तर त्यांनी शेतातच उतरायला हवे. शेतीबरोबर मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटावे यासाठी आपल्या आजुबाजूला वाहणारे झरे, नद्या यांचे संरक्षणही झाले पाहिजे.’

Students handling and enjoying many things related to agriculture
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव

रेंजल यांच्या फार्ममध्ये नुकसेच सेंट झॅव्हिअरच्या मुलांनी प्रत्यक्ष शेतात उतरुन शेतीचे धडे घेतले. आजपर्यंत अशाप्रकारे अनेक मुलांनी त्यांच्या फार्मला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केलेली आहे. रेंजल म्हणतात, ‘मला कृषी व शेतीविषयक आवड आहे. त्यामुळे येथे येणाऱ्याना माझे सदैव सहकार्य असते.

मी पैशांसाठी नव्हे तर मला शेतीची आवड आहे म्हणून या क्षेत्राकडे वळलो आहे. आपला निसर्ग व जैवविविधता टिकुन ठेवणे व त्याचे रक्षण करणे प्रत्येकाच्या हातात आहे. कोरोना शेती आमच्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सांगून गेला. सरकारने सुध्दा अनेक योजना आणुन स्वयंपुर्ण बनणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मी भाजी लागवडीबरोबर सेंद्रिय खतही निर्माण करतो.

Students handling and enjoying many things related to agriculture
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

तसेच आंबा, फणस, काजू यांची कलमे तयार करण्याचे धडे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जातात. काही दिवसापुर्वी येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी शेतीविषयक माहिती घेऊन व प्रत्यक्ष शेतात उतरुन कामे केली. यात सहभागी झालेल्या मुलांना प्रत्यक्ष ज्ञान देताना मला खुपच आनंद झाला होता. ‘

त्यांच्या फार्मवर येऊन मुले शिकतात याचा त्यांच्या मनाला समाधान व आनंद होत असतो. मुलांना त्याचा त्यांना भविष्यात फायदा होईल असे ते म्ह्णतात. रेंजल यांची एकुण २५ एकर जमीन आहे. बाजूला नदी असल्याने निसर्गरम्य अश्या या ठिकाणी भेटी देणारे हरवून जातात. पाहुणे निसर्गाचा आनंद घेताना रेंजल हे स्वतः येणाऱ्यांना आपल्या हातातून स्वयंपाक करुन घालतात. ते म्हणतात, ‘येथे येणाऱ्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. आजची मुले ही उद्याचे भविष्य आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com