Apple Bread Rolls Recipe: सकाळच्या नाश्त्यात घ्या सफरचंद ब्रेड रोलचा आस्वाद

सकाळच्या नाश्त्यात सफरचंद ब्रेड रोल अगदी कमी वेळेत तयार होऊ शकते.
Apple Bread Rolls Recipe:
Apple Bread Rolls Recipe:Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Apple Bread Rolls Recipe: बर्‍याच लोकांना त्यांचा नाश्ता हेल्दी पण त्याचवेळी चवीने परिपूर्ण हवा असतो. तुम्ही सफरचंद वापरून तयार केलेला ब्रेड रोल नाश्त्यात बनवू शकता. ही एक हेल्दी रेसिपी आहे. सफरचंद ब्रेड रोल अगदी कमी साहित्यासह सहजपणे तयार केला जाऊ शकतो. हा ब्रेड बनवायला जास्त वेळ लागत नाही.

जर तुम्ही आत्तापर्यंत सफरचंद ब्रेड रोलची रेसिपी घरी करून पाहिली नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज बनवू शकता. सफरचंद ब्रेड रोल मुलांच्या जेवणाच्या डब्यासाठी देखील एक उत्तम खाद्यपदार्थ असू शकतो. चला जाणून घेऊया सफरचंद ब्रेड रोल बनवण्याची रेसिपी.

  • सफरचंद ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड स्लाइस - 6

सफरचंद बारीक चिरलेले - 4 कप

साखर - 1/2 कप

मेल्टेड बटर - 4 टेस्पून

दालचिनी पावडर - 1 टीस्पून

जायफळ पावडर - 1/4 टीस्पून

लिंबाचा रस - 1 टीस्पून

  • सफरचंद ब्रेड रोल बनवण्याची कृती

सफरचंद ब्रेड रोल बनवण्यासाठी पहिले सफरचंदाचे बारीक तुकडे करावे. आता एका कढईत बटर घालून मध्यम आचेवर गरम करावे. लोणी वितळल्यानंतर त्यात सफरचंदाचे तुकडे टाकून शिजवा.

थोड्या वेळाने कढईत साखर, लिंबाचा रस, दालचिनी पावडर आणि जायफळ पूड टाका आणि मिक्स करा. सफरचंद 2-3 मिनिटे शिजवल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. आता सफरचंद व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवा.

काही वेळाने मिश्रण उकळायला सुरुवात होईल. याला 5-6 मिनिटे लागू शकतात. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. आता स्टफिंग तयार आहे. हे एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.

आता ब्रेड स्लाईस घ्या आणि चाकूच्या मदतीने त्याच्या कडा कापून घ्या. यानंतर, रोलिंग पिनच्या मदतीने, ब्रेड स्लाइस बाहेर काढा आणि पसरवा. आता ब्रेड स्लाइसच्या दोन्ही बाजूंना बटर लावा. यानंतर, ब्रेड स्लाइसवर 2-3 चमचे बनवलेलं स्टफिंग घालून पसरवा. यानंतर ब्रेड स्लाइस फोल्ड करून रोल तयार करा. त्याचप्रमाणे एक एक करून सफरचंद ब्रेड रोल बनवा.

आता सफरचंद ब्रेड रोल मध्यम आचेवर ग्रील करा. याआधी प्रत्येक रोलच्या वरच्या बाजूला बटर लावा. रोलचा रंग सोनेरी तपकिरी होईपर्यंत ग्रील करावा लागतो. आता चविष्ट आणि हेल्दी सफरचंद ब्रेड रोल नाश्त्यासाठी तयार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Agriculture
Goa 97 Voters Electoral Roll
PM Modi Digital India New Chapter
American woman reacts to fake AI video India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com