पक्षाच्या गटबाजीमुळे तेलंगणा काँग्रेसची बिकट अवस्था! राहुल गांधींची नेत्यांसोबत बैठक

राज्यातील सुमारे 30 नेते आणि राहुल गांधी यांच्यात मॅरेथॉन बैठक झाली.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

तेलंगणा (Telangana) काँग्रेसमधील (Congress) संकट अधिक गडद होताना दिसत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी पक्षाने नवी यंत्रणा तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या कामावर तेलंगणातील अनेक नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. नुकतीच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली आहे त्यावेळी त्यांनी नेत्यांना एकजुटीने काम करण्याचे अवाहन केले आहे. (A marathon meeting was held between about 30 leaders of the state and Rahul Gandhi)

Rahul Gandhi
भारताची आर्थिक स्थिती श्रीलंकेपेक्षाही वाईट; ममता बॅनर्जी

माध्यमांनुसार, केंद्रीय नेतृत्वाने रेड्डींना विरोध करणाऱ्या नेत्यांना सांगितले की, त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक यंत्रणा उभारली जाणार आहे. राज्यातील सुमारे 30 नेते आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एका नेत्याने वृत्तपत्राला माहिती दिली की या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती देखील स्थापन केली जाऊ शकते.

एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, "चांगली गोष्ट म्हणजे सर्व मतभेद असतानाही 30 हून अधिक नेते एकत्र बसले आणि राहुल गांधींसोबत तीन-चार तास चर्चेने एकत्र काढले." "त्यांनी काही लोकांच्या समस्या ऐकल्या आणि इतरांच्या समस्या... नवीन यंत्रणेने सोडवल्या जातील," असेही ते यावेळी म्हणाले, आज एकदिलाने लढणे आणि ठसा उमटवणे हे पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट असल्याचे राहुल गांधींनी यावेळी नेत्यांना सांगितले आहे.

Rahul Gandhi
गुजरात निवडणुकीत 'आप' मारणार बाजी? भाजपची होणार धोबीपछाड

नव्या यंत्रणेबाबत ते म्हणाले की, 'वरिष्ठ नेत्यांच्या समितीसारखी गोष्ट' स्थापन केली जाणार आहे. रेड्डी यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, आमदार डी श्रीधर बाबू आणि ज्येष्ठ नेते व्ही हनुमंत राव यांच्यासह अनेक नेत्यांची नावे यामध्ये आहेत. दुसरा नेता म्हणाला की, “लोकांमध्ये मोठे मतभेद दिसून येत आहेत, त्यांच्यातील संवाद काहीसा चांगला नाही. त्यामुळेच ही बैठक बोलावण्यात आली आहे असंही स्पष्ट मत गांधींनी यावेळी मांडल.

तेलंगणा काँग्रेसचे कार्याध्यक्ष टी जयप्रकाश रेड्डी यांनीही उघडपणे रेवंत रेड्डी यांच्यावर टीका केली. सोमवारी झालेल्या बैठकीत रेवंत रेड्डी, केसी वेणुगोपाल, मणिकम टागोर याबैठकीला उपस्थित होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हुजूराबाद पोटनिवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीनंतर तेलंगणातील काँग्रेसमध्ये वादाला नवीन तोंड फुटले आहे.

Rahul Gandhi
गोरखनाथ मंदिर हल्ल्याबाबत यूपी पोलीस आणि सरकारचा मोठा खुलासा

काँग्रेसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चिंता!

राज्यात विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षाच्या अखेरीस होणार असल्या तरी, काँग्रेस नेतृत्वाला अडचणी दूर करून लवकर तयारी सुरू करायची असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते आहे. पक्ष निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू यांची मदत घेऊ शकतो, असे वृत्त समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com