पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आम आदमी पक्षाने आपला मोर्चा आता गुजरातकडे वळवला आहे. ( Survey under AAP Gujarat) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी दोन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये रोड शो केला होता. आता आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारे दावा करण्यात आला आहे की,यावर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला जवळपास 58 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसबद्दल असंतुष्ट असलेल्या ग्रामीण मतदारांची आणि शहरी भागातील कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय मतदारांची मते पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. (The Aam Aadmi Party could win around 58 seats in the Gujarat Assembly elections according to a survey conducted by the party)
डॉ. पाठक म्हणाले, ''अंतर्गत सर्वेक्षणानुसार आम्ही 58 जागा जिंकू. गुजरातच्या ग्रामीण भागातील जनता आम्हाला मतदान करत आहे. तर दुसरीकडे शहरी भागातील निम्न आणि मध्यमवर्गीयांना बदल हवा आहे. आम्हाला विश्वास आहे की, गुजरातची जनता आम्हाला मतदान करु शकते.'' पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 'आप' च्या प्रचंड विजयासाठी डॉ. पाठक यांनी कंबर कसली होती.
पंजाबचे राज्यसभा सदस्य पाठक पुढे म्हणाले, "ग्रामीण गुजरातमधील लोकांचे मत आहे की, काँग्रेस इथे भाजपला पराभूत करु शकत नाही. गुजरातच्या ग्रामीण भागातील काँग्रेसचे मतदार आम्हाला मतदान करत आहेत. आज हीच परिस्थिती असून निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येईल तसतशी आमची संख्या वाढेल.''
शिवाय, गुजरातमधील भाजप सरकारच्या गुप्तचर शाखेच्या सर्वेक्षणातही 'आप' ला 55 जागा मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तत्पूर्वी, AAP चे गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया म्हणाले की, ''आम्हाला या गुप्तचर सर्वेक्षण अहवालाविषयी सूत्रांकडून समजले आहे. भाजप आमच्या संभाव्य कामगिरीने चकित झाला आहे.'' आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी गुजरातचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण केला. यादरम्यान त्यांनी रोड शोसह काही कार्यक्रमात सहभाग घेतला होता. पाठक जे सोमवारी आपचे राज्य प्रभारी बनले आहेत. पाठक पुढे म्हणाले की, ''आमचा पक्ष इथे सर्व जागांवर लढणार आहे. कारण गुजरातच्या जनतेला बदल हवा आहे. भाजप गेल्या 27 वर्षांपासून इथे सत्तेत आहे.''
डॉ. पाठक यांनी दावा केला की, ''लोकांना माहित आहे की, केवळ आप भाजपला पराभूत करु शकतो, काँग्रेसला नाही. राज्याच्या 182 सदस्यीय विधानसभेत सध्या काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.