80 वर्षीय पुष्पा यांनी आपली संपूर्ण संपत्ती केली राहुल गांधींच्या नावावर

80 वर्षीय पुष्पा मुंजियाल यांनी न्यायालयात इच्छापत्र सादर केले असून, त्यांची सर्व संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर असल्याचे जाहीर केले आहे.
80-year-old Pushpa made his entire fortune in the name of congress leader Rahul Gandhi
80-year-old Pushpa made his entire fortune in the name of congress leader Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

डेहराडून: उत्तराखंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, डेहराडूनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने सोमवारी कोर्टात आपली सर्व संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर करण्याचा मृत्यूपत्र सादर केला आहे. मृत्युपत्रात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती देताना, 80 वर्षीय पुष्पा मुंजियाल यांनी त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची विनंती न्यायालयाला केली. (80-year-old Pushpa made his entire fortune in the name of congress leader Rahul Gandhi)

80-year-old Pushpa made his entire fortune in the name of congress leader Rahul Gandhi
रणरणत्या 42 डिग्री तापमानात गुरुजींची फुड डिलिव्हरी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची मदत

त्याच वेळी डेहराडून मेट्रोपॉलिटन काँग्रेसचे अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, नंतर मुंजियाल यांनी यमुना कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रीतम सिंह यांना मालमत्तेचे मृत्यूपत्र सुपूर्द केले.

म्हणुन राहुल गांधी यांच्या नावाने केले मृत्युपत्र

पूर्वी सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या मुंजियाल म्हणतात की राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विचारांचा खूप प्रभाव असल्याने तिने तिची मालमत्ता त्यांना दिली आहे. ते म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत गांधी घराण्याने नेहमीच पुढे जाऊन देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे.

80-year-old Pushpa made his entire fortune in the name of congress leader Rahul Gandhi
बदली रोखायची असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव, अधिकाऱ्याच्या जाचामुळे पतीची आत्महत्या

त्याचबरोबर ते म्हणाले, 'इंदिरा गांधी (Indira Gandhi) असोत की राजीव गांधी, त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान दिले. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे.

आपल्या वडिलांचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी जवळचे संबंध असल्याचेही या वृद्ध महिलेने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या 80 वर्षीय पुष्पा मुंजियाल सध्या डेहराडूनमधील प्रेमधाम वृद्धाश्रमात राहत आहेत. त्याचवेळी कोर्टात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती देताना मुंजियाल यांनी राहुल गांधी यांच्या नावाने मृत्युपत्र सादर केले आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी त्यांच्याकडे सोपवण्यात यावी, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com