रणरणत्या 42 डिग्री तापमानात गुरुजींची फुड डिलिव्हरी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची मदत

फूड डिलिव्हरी बॉईजचा आणि इतर कामगारांचा, जे उन्हाचा कडाका सहन करूनही आपल्या सेवे मध्ये रूजू आहेत.
Social media
Social mediaDainik Gomantak
Published on
Updated on

एप्रिल महिन्यातील प्रचंड उकाड्याने लोकांची अवस्था बिकट झाली. मे-जूनचा विचार करून मला तर घामच फुटतो. अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला. आता जरा विचार करा त्या मजुरांचा, फूड डिलिव्हरी बॉईजचा आणि इतर कामगारांचा, जे उन्हाचा कडाका सहन करूनही आपल्या सेवे मध्ये रूजू आहेत. (The teacher delivered the food on a bicycle at a temperature of 42 degrees while the netizens helped him)

Social media
बदली रोखायची असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव, अधिकाऱ्याच्या जाचामुळे पतीची आत्महत्या

अशा कडक उन्हात फूड डिलिव्हरी बॉय (Food Delivery Boy) काम करत आहेत, आणि असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार वायरल होत आहे. खरतर, 42 डिग्री तापमाप मध्ये सायकल वरून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहेत. अश्या दृश्याने ऑर्डर करणाऱ्याचे मन देखील वितळून गेले, तर त्या नंतर क्राऊड फंडिंग चालू झाले. आणि इंटरनेटवर त्या व्हिडीओचे वातावरण अश्या प्रकारे झाले की, नेटिझन्स कडून भरभरून प्रेम मिळाले, त्यानंतर पैशांचा पाऊस झाला आणि त्या डिलीव्हरी बॉयला नवीन बाईक खरेदी केली.

त्यामुळे घरचा खर्च भागवता येत नसल्याने दुर्गा शंकर मुलांना ऑनलाइन शिकवणीही देत आहेत. यासाठी त्यांनी कर्ज घेऊन लॅपटॉप खरेदी केला, त्याचा हप्ता ते चालूच्या पगारातून भरतात. याशिवाय ते दर महिन्याला काही पैसेही वाचवतात जेणेकरून त्यांनी बाईक खरेदी करता येईल. दुर्गा शंकर सांगतात की, एका दिवसात 10 ते 12 डिलीव्हरी ऑर्डर पोहचवतात. दुचाकी सापडली तर त्यांचे काम आनखी सोपे होईल.

Social media
'तृणमूलचे कार्यकर्ते आम्हाला मारत होते अन् पोलीस बघत होते...' भाजपचा आरोप

हे प्रकरण राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडा येथील आहे, तर 11 एप्रिल रोजी आदित्य शर्मा नावाच्या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयबद्दल एक ट्विट केले होते, जे सध्या इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. आदित्य शर्माने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आज माझी ऑर्डर वेळेवर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे डिलिव्हरी बॉय सायकलवरून ऑर्डर देण्यासाठी आला होता. त्याने पुढे लिहिले की, 'माझ्या शहराचे तापमान 42 अंशावर आहे, पण त्यानंतरही मला माझी ऑर्डर वेळेवर मिळाली आहे.' कडक उन्हातही सायकलवरून ऑर्डर वेळेवर मिळाल्याने आदित्यचे मन खचले.

यानंतर त्याने डिलिव्हरी बॉयला मदत करण्याचा विचार केला. आदित्यने एकामागून एक ट्विट करत डिलिव्हरी बॉयची गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली, जी सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल ट्विटनुसार, दुर्गा शंकर मीना असे डिलिव्हरी बॉयचे नाव असून, त्याने बीकॉमपर्यंत शिक्षण पुर्ण केले आहे. एका खासगी शाळेत ते 12 वर्षे इंग्रजीचे शिक्षक देखील होते. पण ह्या कोरोनाच्या काळात त्यांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत घरखर्च चालवण्यासाठी ते झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय बनले. दुर्गा शंकर यांनी सांगितले की, ते एका महिन्यात 10 हजार रुपयांपर्यंत कमावतात. गेल्या चार महिन्यांपासून ते डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत.

Social media
डोळ्यांच्या कर्करोगावर उपचार करणे होणार सोपे

यानंतर आदित्यने व्हिडीओ काढून डिलिव्हरी बॉयला मदत करण्यासाठी क्राउडफंडिंगचा सहारा घेतला. त्याने दुर्गा शंकराचा UPI आयडी शेअर केला आहे, जेणेकरून पैसे थेट त्याच्या खात्यात पोहोचतील. आदित्यने सांगितले की त्यांनी 75 हजार जमवण्याचे टार्गेट ठेवले होते. पण इंटरनेटच्या लोकांनी एवढा प्रेमाचा वर्षाव केला की तीन तासांत सुमारे दीड लाख रक्कम जमा झाली. कपिल मुकुंद बोरवानी नावाच्या व्यक्तीने सर्वाधिक 10 हजार रुपयांची मदत केली. आदित्यच्या म्हणण्यानुसार परदेशातील लोकांनीही मदत केली. या पैशातून ते आता दुर्गा शंकर यांना त्यांच्या आवडीची बाईक मिळवून देणार आहे. यासोबतच संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्यानंतर ती सोशल मीडियावरही शेअर करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com